गावठी रिव्हॉल्व्हर व कोयते बाळगणा-या अटक आरोपीकडुन घरफोडीचा गुन्हा उघड भारती विदयापीठ पोलीसांची कामगिरी
पुणे : संकेत डुंगरवाल
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
पुण्यात कात्रज जांभुळवाडी येथील नविन बोगदयाजवळील जांभळे पेट्रोल पंपाजवळ वाहनचालकांना लुटण्याच्या इराद्याने घातक हत्यार जवळ बाळगणार्या दोन आरोपींना भारती विद्यापीठ तपास पथकातील पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 गावठी पिस्तूल, 1 जीवंत काडतूस व 2 धारदार लोखंडी कोयता जप्त करत आरोपींची तपासकामी सखोल चौकशी करून घरफोडीचा दाखल गुन्हा उघडकीस आणत गुन्ह्यात चोरी गेलेल्या रकमेपैकी 2 लाख 18 हजार रुपये रोख रक्कम जप्त केल्याची कामगिरी केली आहे.
लुटमार करणारे आरोपी ओंकार ऊमेश सातपुते (वय 21, रा.यशोदीप सोसायटी, वारजे माळवाडी, पुणे), प्रितम विठठल ठोंबरे (वय 19, रा.बालाजी रेसीडन्सी, वारजे माळवाडी, पुणे) असे भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विदयापीठ पोलीस स्टेशन हद्दीत कात्रज घाट परिसर, स्वामी नारायण, गुजरवाडी येथील आडबाजुच्या भागात चोरी, जबरी चोरी, वाहनचालकांना लुटालुटीचे गुन्हे घडत असल्याने अशा गुन्ह्यांना प्रतिबंधात्मक करण्याकामी मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.जगन्नाथ कळसकर यांनी दिलेल्या सुचनेनूसार तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे व पोलीस स्टाफ हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असतांना पोलीस अंमलदार संतोष भापकर, सचिन पवार व राहूल तांबे यांना नविन बोगदयाजवळील जांभळे पेट्रोल पंपाजवळ, जांभुळवाडी येथे दोन संशयीत इसम लुटमारी करण्याच्या इराद्याने घातक हत्यार जवळ बाळगत काळ्या रंगाच्या शाईन मोटार सायकलसह थांबले असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.जगन्नाथ कळसकर व मा.पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री.अर्जुन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांनी त्यांच्या स्टाफसह त्याठिकाणी जाऊन सापळा रचून लुटमारीच्या इराद्याने थांबलेले आरोपी ओंकार ऊमेश सातपुते (वय 21, रा.यशोदीप सोसायटी, वारजे माळवाडी, पुणे), प्रितम विठठल ठोंबरे (वय 19, रा.बालाजी रेसीडन्सी, वारजे माळवाडी, पुणे) यांना शाईन मोटार सायकलसह ताब्यात घेत त्यांची अंगझडतीत घेतली असता आरोपी ओंकार सातपुते याच्याजवळ 1 गावठी पिस्टल, 1 जिवंत काडतूस, 1 धारदार कोयता व आरोपी प्रितम ठोंबरे याच्याजवळून 1 लांबडा धारदार कोयता जप्त करण्यात आला आहे. त्यांच्यावर भारती विदयापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना अटक करुन त्यांच्याकडे तपासकामी सखोल चौकशी केली असता आरोपी ओंकार सातपुते, प्रितम ठोंबरे यांनी त्यांचा आणखी एक साथीदार साहील आनंद मोरे (वय 18, रा.त्रिमुती सोसायटी, वारजे माळवाडी, पुणे) याच्या मदतीने शनिवार दि.16 जानेवारी 2021 रोजी पहाटेच्यावेळी आंबेगाव बुद्रुक, धबाडी येथील श्री गणेश सुपर मार्ट व त्याचे जवळ असलेल्या सुप्रिया किराणा दुकानांचे शटर उचकटुन चोरी केल्याची कबुल दिली. त्यानुसार त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या रकमेपैकी 2 लाख 18 हजार रूपये रोख रक्कम जप्त केली आहे.
ही कामगिरी मा.श्री.सागर पाटील पोलीस उपआयुक्त, परिमंडळ 2 पुणे शहर, मा.श्री.सर्जेराव बाबर सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगटे विभाग, मा.श्री.जगन्नाथ कळसकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विदयापीठ पोलीस ठाणे,मा.श्री.अर्जुन बोत्रे पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकांचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, पोलीस अमंलदार रविन्द्र भोसले, अण्णासाहेब माडीवाले, संतोष भापकर, सोमनाथ सुतार, निलेश खोमणे, गणेश सुतार, सर्फराज देशमुख, सचिन पवार, समिर बागसिराज, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे, विक्रम सावंत यांनी केली आहे.