भारती विद्यापीठ वाहतूक विभाग : अनेक विद्यार्थाचा सहभाग
पुणे : संकेत डुंगरवाल
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
मोटार वाहन अपघातांना आळा बसावा व वाहतूक नियमांचा प्रचार व प्रसार होण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत 22/01/2021 रोजी भारती विद्यापीठ वाहतूक विभागामार्फत सरहद स्कूल व ज्यु. कॉलेज, कात्रज पुणे शहर येथे विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा, वाहतूक नियम याबाबत प्रबोधन करण्यात आले.
यावेळी भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक उदय शिंगाडे यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना रस्ता सुरक्षेत विद्यार्थ्यांचा सहभाग, वाहतूक नियम, सामाजिक बांधिलकी, सडक सुरक्षा जीवन सुरक्षा, वाहतूक सुधारणा अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी सरहद शैक्षणिक संस्थेच्या मनीषा वाडेकर, मयूर मसुरकर व अन्य शिक्षक व सहाय्यक पोलीस फौजदार विठ्ठल टिळेकर, पोलीस हवालदार विजय घिसरे, सचिन जाधव, यांच्या सह अनेक विद्यार्थी व स्टाफ उपस्थित होते. भारती विद्यापीठ वाहतूक विभागाच्या या कार्यशाळेचे भागामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे. भारती विद्यापीठ वाहतूक विभागातील वाहतूक पोलीस करीत असलेल्या कार्यामुळे कात्रज व परिसरातील वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरळीत होण्यास मदत झाली आहे.