आवृत्ती पुणे

पालघनसारख्या हत्याराने मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

वानवडी पोलिसांत फिर्याद : काळेपडळ आरटीओ मैदानाजवळ घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : क्रिकेट खेळताना किरकोळ कारणावरून पालघनसारख्या हत्याराने मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना काळेपडळ येथील आरटीओ मैदानाजवळील संयोग कॉलनीतील मंदिराजवळ घडली.याप्रकरणी संजू पटणपल्लू (वय ४०, हडपसर, पुणे) यांनी वानवडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, … Read more

15 वर्षीय मुलीवर 17 वर्षीय मुलाचा लैंगिक अत्याचार

विश्रांतवाडी पोलिसांत पोस्कोअंतर्गत गुन्हा : मुलीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अल्पवयीन मुलीला हॉटेलवर नेऊन तिच्यावर अल्पवयीन मुलाने वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मुलीने नकार दिल्यावर शिवीगाळ करुन मारुन टाकण्याची धमकी दिली. हा प्रकार मे ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान लोहगाव, पोरवाल रोडवरील लॉजवर घडला आहे. … Read more

तुझी विकेटच काढतो असे म्हणणाऱ्यास केले जेरबंद

येरवडा-भाटनगर येथील घटना : चॉपरने डोक्यात वार करून केले जखमी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पत्नीबरोबर जात असताना शिवीगाळ करू नये, असे सांगितल्याने तुझी आज विकेटच काढतो, माझे नादी लागायचे नाही, असे म्हणून चॉपरने वार करून गंभीर जखमी करणाऱ्यास अटक केले. ही घटना भाटनगर येथील भाजीमंडई येथे शुक्रवारी (१२ नोव्हेंबर, २०२१) रात्री साडेअकराच्या सुमारास … Read more

कब्रस्तानात प्रेमीयुगुलाचं सुरू होतं ‘गुलूगुलू’

दापोडीतील घटना : जोडप्याला हटकल्याने सुरक्षारक्षकाला बेदम चोपले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दापोडी परिसरातील कब्रस्तानामध्ये एक प्रेमीयुगुल गप्पा मारत बसले होते. त्यावेळी या जोडप्याला हटकल्याने तरुणाने आणि त्याच्या साथिदारांनी सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण केली. सुरक्षारक्षक आझम खान (रा. दापोडी) हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी चार जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले … Read more

बनावट कागदपत्राद्वारे जामीन मिळवून देणार्‍या रॅकेटवर ‘धाड’

युनिट-१ व ५ ची धडाकेबाज कारवाई : शिवाजीनगर न्यायालयाबाहेरच सात जणांना बेड्या ठोकल्या महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे :गुन्हे शाखेने गेल्या वर्षी गुन्हेगारांना जामीन मिळवून देणार्‍या रॅकेटचा भांडाफोड केला होता. आता पुन्हा एकदा शिवाजीनगर न्यायालयाबाहेर कारवाई करुन गुन्हेगारांना बनावट कागदपत्राद्वारे जामीन मिळवून देणार्‍या ७ जणांना बेड्या ठोकल्या. गोपाळ पुंडलिक कांगणे (वय ३३, रा. मोरवाडी, पिंपरी), … Read more

दुकानातून रोकड चोरणाऱ्या सराईताच्या मुसक्या आवळल्या

लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी : ५० हजार रुपयांचा ऐवज केला जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लोणी काळभोरमधील दुकानातून रोख रक्कम चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करून ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. लोणी काळभोर पोलीसांनी ही कामगिरी केली. निलेश मिठू कदम (रा. नायगाव, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी … Read more

तरुणीने अंधाशी लग्न करून लाखोंचा ऐवज केला लंपास

विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : तरुणीसह पाच सापडले अडचणीत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या तरुणाबरोबर लग्न केले. तरुणाच्या वडिलांकडून वेळोवेळी लाखो रुपये घेतले अन् एके दिवशी घरातील दागिने घेऊन तिने पोबारा केला. या प्रकारामुळे पाचजण चांगलेच अडचणीत सापडले आहेत. हा प्रकार ३१ जानेवारी ते २१ जुलै दरम्यान घडला. याप्रकरणी विमानतळ … Read more

पालिकेचा आरोग्य निरीक्षक लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ड्युटी ठराविक ठिकाणी देण्यासाठी मागितली होती लाच : कचरा गोळा करणाऱ्याने केली होती तक्रार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षकास लाच घेताना पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी (दि. ११) दुपारी रंगेहाथ पकडले आहे. कचरा गोळा करणार्‍या एकाने तक्रार दिल्यानंतर अ‍ॅन्टी करप्शन विभागाने ही कारवाई केली आहे. मनपाच्या आरोग्य निरीक्षकाने डयुटी ठराविक … Read more

आक्रम शेख टोळीविरुद्ध “मोक्का कायद्यांतर्गत कारवाई “

पोलीस आयुक्त यांची मोक्का अंतर्गत ५८ वी कारवाई : गुलटेकडी परिसरात दहशत निर्माण करीत होता महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क पुणे : स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीमधील डायस प्लॉट, गुलटेकडी येथे स्वतःला भाई, दादा समजून समाजामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगार अजिज शेख टोळीविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहराचा कारभार घेतल्यानंतर … Read more

एम. जी. एन्टप्रायजेसच्या अलनेश सोमजीच्या पोलीस कोठडीत वाढ

कोट्यवधी रुपयांचे फसवणूक प्रकरण : पत्नी डिंपल सोमजीचा जामीनासाठी अर्ज महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर वार्षिक 24 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील अनेक नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एम.जी. एन्टप्रायजेसच्या अलनेश अकील सोमजी, डिंपल अलनेश सोमजी (दोघे रा. अमर वेस्टव्हिड, लेन नं. 5, कोरेगाव पार्क, पुणे) यांना पुणे गुन्हे शाखेच्या … Read more