पोलीस आयुक्त यांची मोक्का अंतर्गत ५८ वी कारवाई : गुलटेकडी परिसरात दहशत निर्माण करीत होता
महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क
पुणे : स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीमधील डायस प्लॉट, गुलटेकडी येथे स्वतःला भाई, दादा समजून समाजामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगार अजिज शेख टोळीविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहराचा कारभार घेतल्यानंतर एका वर्षामध्ये मोक्का कायद्यांतर्गत ५८वी कारवाई आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक तुषार भोसले यांनी अक्रम शेख व त्याचे साथीदार यांना अटक करून पोलीस कोठडी रिमांड घेऊन गुन्ह्यातील घातक शस्त्रे हस्तगत केली आहेत. त्यांच्या दहशतीमुळे कोणी तक्रार देत नव्हते. अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी मोक्का कायद्यांन्वये कारवाई होण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी पोलीस उपायुक्त यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त यांना प्रस्ताव सादर केला होता.
अक्रम अजिज शेख, अमित मल्लिकार्जुन शेकापुरे (वय २०), अन्वर ऊर्फ जंब्या शाकीर शेख, शाहरूख अजिज शेख (वय २४, रा. औद्योगिक वसाहत, गुलटेकडी), ओमकार दयानंद पवार (वय १९), इमाम शब्बीर शेख (वय १८, रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलमांचा समावेश करण्याबाबत अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी मंजुरी दिल्याने मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलीस आयुक्त लष्कर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत सांगळे पुढील तपास करीत आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक तुषार भोसले, अशोक येवले, सहायक पोलीस फौजदार प्रमोद कळमकर, पोलीस नाईक विजय कुंभार, वैभव मोरे, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर ढगे, मनोज भोकरे, गोडसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
