लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी : ५० हजार रुपयांचा ऐवज केला जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : लोणी काळभोरमधील दुकानातून रोख रक्कम चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करून ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. लोणी काळभोर पोलीसांनी ही कामगिरी केली.
निलेश मिठू कदम (रा. नायगाव, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, लोणी काळभोरमधील दुकानातून १७ ऑगस्ट २०२१ रोजी १४ हजार ७०० रुपयांची चोरी करणाऱ्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेत तपास केला असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच नायगाव व लोणी काळभोर गावच्या हद्दीतून दोन मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकल जप्त केल्या आहेत. आरोपींवर लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये तीन गुन्हे दाखल असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयंत हंचाटे करीत आहेत.
अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, पोलीस हवालदार नरेंद्र सोनवणे, पोलीस नाईक अमित साळुंके, संभाजी देवीकर, संतोष राठोड, पोलीस शिपाई राजेश दराडे, निखील पवार, बाजीराव वीर, शैलेश कुदळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
