येरवडा-भाटनगर येथील घटना : चॉपरने डोक्यात वार करून केले जखमी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पत्नीबरोबर जात असताना शिवीगाळ करू नये, असे सांगितल्याने तुझी आज विकेटच काढतो, माझे नादी लागायचे नाही, असे म्हणून चॉपरने वार करून गंभीर जखमी करणाऱ्यास अटक केले. ही घटना भाटनगर येथील भाजीमंडई येथे शुक्रवारी (१२ नोव्हेंबर, २०२१) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.
निहाल विशाल भाट (वय २०, रा. भाटनगर, हनुमान स्टोअरसमोर, येरवडा, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शवम ऊर्फ शुभम मिनेकर (वय २८, रा. येरवडा, पुणे) यांनी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, शवम ऊर्फ शुभम मिनेकर पत्नीबरोबर जात होते. त्यावेळी आरोपीला शिवीगाळ करू नको, असे सांगितले. त्याचा मनामध्ये राग धरून वाईट शिवीगाळ करून आज तुझी विकेटच काढतो, माझे नादी लागायचे नाय, असे म्हणत चॉपरने डोक्यात वार करून गंभीरजखमी केले. तसेच पोलिसांत तक्रार केल्यास ठार मारण्याची धकमी केली. या प्रकरणाचा पुढील तपास येरवडा पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक वारंगुले करीत आहेत.
