आवृत्ती पुणे

पोलीस आयुक्तालयातील ८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

अपर पोलीस आयुक्त डॉ. सुपेकर : बुधवारपासून आदेश जारी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुणे पोलीस आयुक्तालयातील ८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी (दि. ९ डिसेंबर २०२१) रात्री उशिरा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मान्यतेने अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर यांनी आदेश काढले आहेत.पोलीस निरीक्षकांची बदली … Read more

पुण्यातील सराईत एक वर्षासाठी औरंगाबाद कारागृहात स्थानबद्ध !

स्वारगेटमधील अट्टल गुन्हेगार – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मागील एक वर्षामध्ये तब्बल 47 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी गुन्हेगारांवर मोक्का … Read more

पुण्यात खळबळ… आयएएस अधिकाऱ्याच्या घरात ‘धाडसी’ चोरी!

मुंढव्यातील घटना : लक्ष्मी पुजनासाठी ठेवलेले दीड किलो सोन्याचे दागिने लंपास महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरात सर्वत्रच दिवाळी उत्साहात साजरी होत असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चोरटयांनी लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच रात्री साडेआकरा ते पाडव्याच्या पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान लक्ष्मी पूजनामध्ये ठेवलेले तब्बल 150 तोळे वजनाचे म्हणजेच दीड किलो सोन्याचे दागिने आणि … Read more

दोघे दुचाकीचोर शिताफीने जेरबंद

फरासखाना पोलिसांची कामगिरी : दोन गुन्ह्यांतील दोन दुचाकी ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज बुधवार पेठेमध्ये रात्री मैत्रिणीला भेटण्यासाठी येऊन जाताना वाहनचोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना फरासखाना पोलिसांनी चोरीच्या गाडीसह ताब्यात घेऊन त्यांच्याकडून वाहनचोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत व्यापारी बाजारपेठ असल्यामुळे गणेशोत्सव सणाचे अनुषंगाने नागरिकांची खरेदी करण्यासाठी गर्दी होत असते. त्यामुळे फरासखाना पोलीस … Read more

गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील मध्यभागात वाहतूक व्यवस्थेत गुरुवारपासून बदल

बाजीराव रस्ता तसेच शिवाजी रस्त्यावरील वाहतुकीत १९ सप्टेंबरपर्यंत बदल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गणेश मूर्ती तसेच पूजा साहित्य खरेदीसाठी गुरुवारी (ता. ९) शहराच्या मध्यभागात होणारी गर्दी विचारात घेऊन बाजीराव रस्ता तसेच शिवाजी रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. गर्दी वाढल्यास शिवाजी रस्ता तसेच बाजीराव रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. मध्यभागातील वाहतूक … Read more

सीमकार्ड अपडेट करणे पडले 11 लाखांना

वानवडी हद्दीतील घटना : चार परप्रांतीयांवर गुन्हा दाखल पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क तुमच्या बीएसएनएल सीमकार्डची मुदत संपली असून, 24 तासात ते बंद पडणार आहे. सीमकार्ड सुरु ठेवण्यासाठी ऑनलाईन अ‍ॅक्टिवेशन बंद असल्याने ऑफलाईन करावे लागेल, असे सांगून पुण्यातील सायबर भामट्याने पुण्यातील एका ज्येष्ठ महिलेच्या बँक खात्याची माहिती घेऊन तब्बल 10 लाख 85 हजारांचा ऑनलाईन … Read more

सराईत टोळीकडून दरोडा आणि घरफोडीचे गुन्हे उघड

युनिट ४ गुन्हे शाखा पुणे शहरची कामगिरी : चौघांना घेतले ताब्यात पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क आंतरराज्यीय सराईत टोळीकडून दरोड्याच्या तयारीसह घरफोडीचे गुन्हे उघड करण्यात युनिट ४ गुन्हे शाखा पुणे शहर यांना यश मिळाले आहे. याप्रकरणी चौघांना ताब्यात घेतले असून, एकाचा शोध सुरू आहे. दि. २४ ऑगस्ट रोजी संशयित रिक्षाचा शोध घेत असताना गुप्त … Read more

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

हडपसर-फुरसुंगीतील घटना : हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पती, सासू, सासरा व नणंद यांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फुरसुंगी (ता. हवेली) येथे हा प्रकार ३१ ऑगस्ट २०२१ रोजी घडला. आरतीकुमारी सुनीलकुमार यादव (वय २१, रा. सिद्धी ग्रीन सोसायटी, रेल्वेगेटजवळ, फुरसुंगी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या … Read more