बाजीराव रस्ता तसेच शिवाजी रस्त्यावरील वाहतुकीत १९ सप्टेंबरपर्यंत बदल
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : गणेश मूर्ती तसेच पूजा साहित्य खरेदीसाठी गुरुवारी (ता. ९) शहराच्या मध्यभागात होणारी गर्दी विचारात घेऊन बाजीराव रस्ता तसेच शिवाजी रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. गर्दी वाढल्यास शिवाजी रस्ता तसेच बाजीराव रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. मध्यभागातील वाहतूक बदल १९ सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहे.
शिवाजी रस्त्यावरून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून (मॉडर्न कॅफे चौक) जंगली महाराज रस्ता, खंडोजीबाबा चौक, टिळक रस्तामार्गे स्वारगेटकडे जावे. पूरम चौकातून बाजीराव रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पूरम चौक टिळक रस्तामार्गे अलका टॉकीज चौक, संभाजी पूलमार्गे इच्छित स्थळी जावे. शनिपार चौक ते मंडई दरम्यानचा रस्ता आवश्यकता भासल्यास बंद करण्यात येईल, तसेच अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणारा रस्तादेखील बंद ठेवण्यात येईल.
वाहनचालकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.
अ) शिवाजी रोडवरील वाहतूक व्यवस्था :
१. शिवाजीरोड वरून स्वारगेटला जाणारे वाहन चालकांसाठी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने खंडोजीबाबा चौक टिळक चौक टिळक रोडने इच्छितस्थळी जातील.
२. स. गो. बर्वे चौकातून पुणे मनपा भवनकडे जाणारे वाहन चालकांसाठी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने झाशी राणी चौक डावीकडे वळून इच्छितस्थळी जातील.
३. अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक बंद करून वाहतूक बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छितस्थळी जातील.
ब) बाजीराव रोडवरील वाहतूक व्यवस्था :
१. पूरम चौकातून बाजीराव रोडवरून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांसाठी पूरम चौकातून टिळक रोडने अलका टॉकीज चौक व पुढे एफसी रोडने इच्छितस्थळी जातील.
२. शनिपार चौकातून मंडईकडे जाणारी पूर्ण वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करून मंडईत जाणाऱ्या वाहन
चालकांनी आपले वाहन पार्किंग करून चालत मंडईकडे जाणे.
३. अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी आपले वाहन पार्किंगमध्ये पार्क करून चालत बुधवार चौकाकडे जाणे

 
			


















