आवृत्ती पुणे

सहकारनगरमध्ये भरदिवसा घरफोडी करणारा जेरबंद

गुन्हे शाखेची कारवाई : ६० हजार रोख आणि ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सहकारनगर, धनकवडी भागात भरदिवसा सदनिकांचे कुलुप तोडून ऐवज लांबविणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेने पकडले. चोरट्याकडून घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून, त्याच्याकडून एक लाख ६० हजारांची रोकड, सोन्याचे दागिने, दुचाकी असा तीन लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. … Read more

बाप रे… पुण्यातील सामूहिक बलात्कार पीडितेवर मुंबईतही अत्याचार

वानवडीतील प्रकरण : आरोपींची संख्या १५ मात्र, 14 जणांनी बलात्कार केल्याचे निष्पन्न महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क वानवडी येथील सामूहिक बलात्कार पीडितेवर मुंबईतही अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे. वानवडी पोलिसांनी तपास करत ठाण्यातून आरोपीला अटक केली आहे. यामुळे बलात्कार प्रकरणातील आरोपींची संख्या 15 झाली असून यातील 14 जणांनी बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार … Read more

पत्नी व सासूच्या त्रासाला कंटाळून बिल्डरची आत्महत्या

लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : आत्महत्येपूर्वी बनवला व्हिडीओ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क लग्न झाल्यापासून वेगळे राहण्यासाठी आणि बाहेर नोकरी करावयाची या कारणावरुन पत्नी आणि सासुच्या त्रासाला कंटाळून बाधकाम व्यावसायिकाने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने मोबाईलवर व्हीडिओ रेकॉर्ड केला असून, त्यामध्ये मी माझे जीवाचे बरे वाईट करीत असून त्यास जबाबदार माझी पत्नी … Read more

येरवड्यात भरधाव वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क भरधाव वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याला अपघात झाला. या अपघातात पादचारी तरूण गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात १२ सप्टेंबरला रात्री साडेअकराच्या सुमारास येरवड्यातील सिद्धार्थनगर समोरील रस्त्यावर घडला. सुभाष सुरेश जाधव (वय ३१, रा. आनंदवाडी, लातूर) असे अपघातात मृत्यू … Read more

तीन लाखांचे मेफेड्रॉन विकणारा ताब्यात

अमली पदार्थ विरोधी पथक क्र. एकची कामगिरी : एकूण सव्वासहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अमली पदार्थ विरोधी पथक क्र. १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी ३,०६,९०० रुपये किमतीचा २० ग्रॅम ४६० मिलिग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमास सिंहगड पोलीस ठाणे हद्दीतून शिताफीने पकडून अटक केली असून, एकूण … Read more

पुन्हा घरफोडी करण्यासाठी आला आणि अडकला पोलिसांच्या जाळ्यात

गुन्हे शाखा युनिट-२ ची कामगिरी : जामिनावर सुटलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क आधी घरफोडी केलेल्या ठिकाणीच पुन्हा घरफोडी करण्यासाठी आलेला असताना जामिनावर सुटलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास मुद्देमालासह ताब्यात घेण्यात गुन्हे शाखा युनिट-२ पुणे शहर पेलिसांना यश मिळाले असून, आरोपीकडून पाउणेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सहकारनगर पोलीस स्टेशनमधील एका गुन्ह्याचा तपास गुन्हे … Read more

गुन्ह्यांतील जप्त मुद्देमाल फिर्यादींना केला परत

बार्शी उपविभागातील पोलिसांकडून आठ लाखांचा मुद्देमाल फिर्यादीच्या ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी उपविभागातील पोलिसांकडून विविध गुन्ह्यांतील जप्त आठ लाखांचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून निर्गती मेळावा कार्यक्रमात फिर्यादींच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी आढावा बैठकीमध्ये दिलेल्या आदेशान्वये बार्शी उपविभागातील पोलीस ठाण्यास विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला व निर्गतीवर प्रलंबित असलेला जप्त … Read more

पीएमपी बसमध्ये तीन लाख ८०हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी

खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : कात्रज-वाकडेवाडी दरम्यान गर्दीचा फायदा घेत चोरट्याने साधला डाव महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पीएमपी बसमध्ये कात्रज-वाकडेवाडी प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेत चोरट्याने महिलेची पर्स चोरून नेली. या पर्समध्ये तीन लाख हजार रुपयांचे दागिने होते. याप्रकरणी औरंगाबादमधील ५२ वर्षीय महिलेने खडकी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. … Read more

होळकरवाडीत फ्लॅट फोडून सव्वादोन लाखाची चोरी

चोरीच्या घटनात वाढ : बंदोबस्त वाढवून पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क चोरट्याने फ्लॅट फोडून रोख दोन लाख रुपयांसह सोन्या-चांदीचे २० हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना होळकरवाडीतील समाधान हाईट्समध्ये ११ सप्टेंबर रोजी घडली. दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी … Read more

व्यायामाला जाणाऱ्यास मारहाण करून लुटले

हडपसर-ग्लायडिंग सेंटरजवळील घटना : हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क व्यायामाला जात असताना दगडाने व हाताने मारहाण करून चार हजार रुपये लुटून नेणाऱ्यास पोलिसांनी जेरबंद केले. ही घटना ग्लायडिंग सेंटर येथील डीमार्टजवळ ११ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली होती. गणेश गौतम कोरडे (वय २१, रा. सिद्धीविनायक पेट्रोल पंपासमोर, शेवाळेवाडी, हडपसर) असे … Read more