आवृत्ती पुणे

शारीरीक संबंधाची मागणी करणार्‍या मॉलच्या मॅनेजरवर गुन्हा

कोंढवा पोलिसांत फिर्याद : शरीर संबंधास नकार देताच कामावरून काढून टाकले महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : रिपोर्टिंगला आलेल्या महिलेकडे एकटक पाहणे, लगट करण्याचा प्रयत्न करुन शारीरीक संबंधाची मागणी करणार्‍या कोंढव्यातील मॉलच्या मॅनेजरवर कोंढवा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १७ फेब्रुवारी २०२२ पासून आतापर्यंत घडला आहे. प्रशांत मोरे (वय ४०, कोंढवा) असे … Read more

डॉक्टरांना धमकावून खंडणी घेणारा मंगेश कांचन जेरबंद

लोणी काळभोर पोलिसांची कारवाई : खंडणी घेताना रंगेहाथ राहत्या घरात पकडले महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : दोन डॉक्टरांना धमकावून तीस लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या. त्याच्या राहत्या घरात खंडणी घेताना मंगळवारी (दि.12) उरुळी कांचन येथे लोणी काळभोर पोलिसांनी कारवाई केली.मंगेश माणिक कांचन (वय – 35 रा. पाढरस्थळ, उरुळी … Read more

सराईताला अटक करून विधिसंघर्षित बालकाला घेतले ताब्यात

सोलापूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी : पाच लाखांचा मुद्देमाल केला जप्त महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क सोलापूर : सराईत मोटारसायकल चोरट्याला आणि विकत घेणाऱ्यांना अटक सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून 11 मोटारसायकली पाच लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. शंकू ऊर्फ शंकर सुरेश काळे (वय 30, रा. बोराळे, ता. मंगळवेढा, सध्या- तामदर्डी, ता. मंगळवेढा) असे … Read more

अवैध वाळू उपसा करणाऱ्याला ठोकल्या बेड्या

सोलापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई : नऊ लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : सोलापूर ग्रामीण पोलिसांनी गोपाळपूर (ता. पंढरपूर, जि.सोलापूर) येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्या एकाला अटक करून चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीकडून 20 ब्रास वाळू, दोन वाहने असा एकूण 9 लाख 71 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल … Read more

मुलांना शाळेत घेऊन जाणार्‍या रिक्षाचा अपघात

नऊ विद्यार्थी जखमी : उरुळी कांचनजवळील बोरीभडक गावातील घटना महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : उरुळी कांचनमधील (ता. हवेली) शाळेत घेऊन येणार्‍या एका विद्यार्थी रिक्षाचा सोमवारी सकाळी अपघात झाला. या अपघातात रिक्षामधील ९ विद्यार्थी जखमी झाले आहेत. ही सर्व मुले बोरीभडक गावात राहणारी आहेत. रिक्षाचालकाच्या डोक्याला जखम झाली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस … Read more

शीतपेयातून झोपेच्या गोळ्या देत खुन करणाऱ्यास ठोकल्या बेड्या

गुन्हे शाखा युनिट-5ची कारवाई : बेलसर (पुरंदर) येथून 10 तासांत केली अटक महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : महिलेला शीतपेयामध्ये झोपेच्या गोळ्या देऊन तिचा खून करणाऱ्या नराधमास 10 तासात गुन्हे शाखेच्या युनिट-5ने बेड्या ठोकल्या. क्राईम पेट्रोल मालिका बघून प्लॅन करीत खून केल्याची आरोपीने कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.किसन सीताराम जगताप (वय 46, रा. बेलसर, ता. पुरंदर, … Read more

महापालिकेच्या तिघांना 15 हजारांची लाच घेताना पकडले

पुणे अँटी करप्शनची कारवाई : कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांचा समावेश महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : महापालिकेच्या कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयातील तिघांना 15 हजार रुपयांची लाच घेताना अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. सोमवारी (दि.11) पुणे एसीबीने कोथरूड क्षेत्रीय कार्यालयात सापळा रचला. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यावर कारवाई केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. … Read more

प्रेमसंबंधाला नकार देत रस्त्यात विनयभंग करणारा जेरबंद

विश्रामबाग पोलिसांत फिर्याद : कुमठेकर रस्त्यावरील चित्र शाळा सोसायटीसमोर घडला प्रकार महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : प्रेमसंबंधाला नकार देणाऱ्या तरुणीचा भररस्त्यात विनयभंग करणाऱ्याला पोलिसांनी जेरबंद केले. हा प्रकार शुक्रवारी (दि.8) सायंकाळी साडेचारच्या सुमारास कुमठेकर रोडवरील चित्र शाळा सोसायटीसमोर घडला आहे. प्रज्वल संजय जाधव (वय 22, रा. नारायण पेठ, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव … Read more

शेअर मार्केटमधून सुरुवातीला दिला नफा, नंतर लाखांना गंडा

कोंढवा पोलिसांत फिर्याद : ऑनलाइन संपर्कातून संपर्क साधत केली फसवणूक महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास चांगला फायदा करुन देण्याच्या आमिषाने सुरवातीला फायदा करुन दिला. मात्र, त्यानंतर लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्यावर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 22 डिसेंबर 2021 ते 15 जानेवारी 2022 या कालावधीत ऑनलाइन घडला आहे. … Read more

पुण्यात गांजाची विक्री करणाऱ्या परप्रांतिय टोळीचा पर्दाफाश

गुन्हे शाखा युनिट-1ची कारवाई : 12 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : पुणे रेल्वे स्टेशन परिसरात आणि कोंढवा परिसरात गांजाची विक्री करणाऱ्या परराज्यातील आरोपींना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-1ने बेड्या ठोकल्या आहेत. पथकाने दोन ठिकाणी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत गांजा, अफीम असा 12 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन … Read more