उस्मानाबाद

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली अर्थिक मदत त्वरीत मिळावी; वारकरी साहीत्य परिषद महिलांची मागणी.

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली अर्थिक मदत त्वरीत मिळावी; वारकरी साहीत्य परिषद महिलांची मागणी.

उस्मानाबाद, कळंब: कोरोना काळात महाराष्ट्र राज्यातील वारकरी कलाकार, किर्तनकार प्रर्वचनकार, भारुड गायक, मुंदगवादक. टाळ, ‘विनावादक यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. या वारकरी कलाकाराची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. याचा विचार होऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व #सांस्कृतीक मंत्री मा. #अमिताजी देशमुख यांनी सर्व महिला, पुरुष व कला करासाठी 5000/- रूपर्य प्रमाणे आर्थिक मदत जाहीर केली आहे.

ही मदत त्वरीत देण्याची व्यावस्था करण्यात यावी अशी मागणी वारकरी साहीत्य परिषद उस्मानाबाद महीला शाखाच्या वतीने जिल्हा अध्यक्षा ह. भ. प. सुनितादेवी आडसुळ यांच्या नेतृवात महीला कलाकारांनी कळंब उपविभागीय अधिकारी श्रीमती आहिल्या गाठाळ व नायब तहसिलदार मुस्तफा खोंदे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

या प्रसंगी जिल्हा सचिव विजया पांचाळ, जि. उपाध्यक्ष अनुराधा मुळे, कळंब ता. अध्यक्षा रंजना खरडकर, सामाजीक कार्यकर्त्या ज्योती ताई सपाटे, महीला कलाकार सुलोचना बिदरकर, छाया शिंगनापुरे, आयोध्य मुंढे, शिवकन्या भोरे, संपदा घोंगडे, सुचिता घोंगडे, संगिता पांचाळ, साधना बिदरकर, शिवकन्या फल्ले, अनिता मोरे, मणिषा करंजकर, रंजना निर्मळ, आर्चाना मुंढे, लता होनराव, रविना करंजकर, शारदा भारती, मिरा गव्हाणे. वनिता काळे यांची उपस्थीती होती.

YouTube Link : https://youtu.be/161MrAS3wcU

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button