आरोग्य चाचण्यांचे दर आता आवाक्यात, विश्वास मात्र तितकाच उच्च
महाराष्ट्र जैन वार्ता
कराड : सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य तपासण्या मिळाव्यात या उद्देशाने डायग्नोपिन डाइग्नोस्टिक संस्थेने आता कराडमध्ये आपली नवीन शाखा सुरू केली आहे. अचूक निदान, आधुनिक तंत्रज्ञान आणि कमी दर हीच डायग्नोपिनची ओळख असून कराड-सातारा परिसरातील नागरिकांसाठी हे मोठे पाऊल ठरणार आहे.
डायग्नोपिन डाइग्नोस्टिक संस्थेच्या नवीन शाखेचे उद्घाटन कराड येथे करण्यात आले. प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, डॉ. सुमित पाटील, सतीश बनवट आणि सुनील शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेली ही संस्था सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात उच्च दर्जाची सेवा देण्याच्या ध्येयाने कार्य करत आहे.
आजकाल आजाराचे निदान वेळेवर आणि अचूक होणे अत्यंत गरजेचे असते. मात्र तपासण्यांचे वाढते दर पाहता अनेक नागरिक तपासण्या टाळतात आणि त्यामुळे गंभीर त्रासांना सामोरे जावे लागते. हीच समस्या ओळखून डायग्नोपिनने कमी किंमतीत तपासण्या आणि अचूक रिपोर्ट देण्याचे ध्येय निश्चित केले आहे.
कराड येथील या नव्या शाखेत एम.आर.आय. केवळ २५००/- मध्ये, सिटी स्कॅन ९९९/- पासून, सोनोग्राफी ५००/- पासून तसेच एक्स-रे, रक्त तपासण्या व इतर चाचण्या अत्यंत परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ही सुविधा सातारा-कोल्हापूर रोडवरील कोल्हापूर नाका, संगम हॉटेलसमोर सुरू झाली असून स्थानिक नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे.
या उद्घाटन सोहळ्याला सतीश भोंगळे, संदीप लोढा, विजय पट्टणशेट्टी, नदीम खान, अस्लम मुल्ला, शैलेन्द्र पाटील, मयूर लखानी, आशीष ओसवाल, बाजीराव घारे, सुरेश रैनाक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रफुल्ल कोठारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन मितेश कोठारी यांनी केले.
