ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सायकल बँकेची स्थापना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : पवन श्रीश्रीमाळ : छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव 2025 निमित्त ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सायकल बँकेची स्थापना करून महाराष्ट्र विद्यालय, बार्शी येथील गरजू विद्यार्थिनींना पाच सायकलींचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी अनिलजी बनसोडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून बार्शी टेक्सटाईल मिलचे जनरल मॅनेजर अजयजी बोरवणकर, प्राचार्य गुंड सर, मुख्याध्यापिका के. डी. धावणे, उपमुख्याध्यापक आर. बी. सपताळे, ओन्ली समाजसेवा संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी, संस्थेचे सचिव विजयकुमार दिवाणजी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, रणनीती, स्त्रियांबद्दलचा सन्मान, नीतिमूल्ये आणि अठरापगड जातींना सोबत घेऊन स्थापन केलेले स्वराज्य यासंदर्भात मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिलजी बनसोडे यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक करत, ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था समाजातील तळागाळातील आणि गरजू लोकांसाठी कार्यरत असल्याचे सांगितले. संस्थेच्या विविध उपक्रमांमध्ये रक्तदान शिबिरे, महिलांचा सन्मान, आदर्श शिक्षक पुरस्कार, कर्णबधिर विद्यार्थ्यांना श्रवणयंत्र वाटप, गुरांना चारा वाटप तसेच महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचा समावेश आहे.
संस्थेचे सहसचिव नागनाथ सोनवणे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी, सचिव विजयकुमार दिवाणजी, सहसचिव नागनाथ सोनवणे, खजिनदार मानकोजी ताकभाते, प्रा. चंद्रकांत उलभगत, रतिकांत हमने, सुरेंद्र स्वामी, सचिन मस्के, अजय तिवारी, सागर घंटे, सुनील नवले, प्रतीक खंडागळे, सायरा मुल्ला, कोमल वाणी, सुजाता अंधारे, सारिका जाधवर, रेखा सुरवसे, रागिनी झेंडे, रेखा सरवदे, पत्रकार राजश्री गवळी, पोलीस जाणीव सेवा संघाच्या भाग्यश्री घोडके, अलका हाडगे, अनुसया आगलावे, मोनिका सोनवणे, आशा स्वामी, सुनिता गायकवाड, त्रिशाला मिसाळ, पार्वती जाधवर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. एन. कसबे यांनी केले, तर आभारप्रदर्शन एस. एल. शिंदे यांनी केले.
