महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातील आघाडीची रिअल इस्टेट डेव्हलपर कंपनी, व्हीटीपी रिअल्टीने दुबईमध्ये (यूएई) आपले नवीन कॉर्पोरेट ऑफिस सुरू केले आहे. यासह, ब्रँडने आपला पहिला मोठा जागतिक विस्तार साध्य केला असून, पुण्यातील रिअल इस्टेट जीसीसी (गल्फ कॉर्पोरेशन कौन्सिल) बाजारपेठेत एनआरआय ग्राहकांसाठी आणली आहे.
अलिशान, आरामदायी आणि सर्जनशील रचनांच्या प्रकल्पांसह, पुण्यातील क्षितिजात परिवर्तन घडवत, व्हीटीपी रिअल्टीने भारतातील आघाडीच्या १० रिअल इस्टेट ब्रँड्समध्ये स्थान मिळवले आहे. ब्रँडचा दुबई मधील विस्तार ही पुण्यासाठी एक अभिमानाची बाब आहे.
व्हीटीपी रिअल्टीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन भंडारी म्हणाले की, “व्हीटीपी रिअल्टीच्या अभिनवतेचा आणि गुणवत्तेचा वारसा जीसीसी बाजारपेठेत नेताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. हा टप्पा केवळ आमच्या व्यवसाय विस्ताराचा भाग नसून, पुण्यातील सर्वोत्कृष्ट रिअल इस्टेट उत्पादने जागतिक स्तरावर प्रदर्शित करण्याचा प्रयत्न आहे.
दुबईमधील आमचे नवीन कार्यालय हे रिअल इस्टेटमध्ये जागतिक नेतृत्व करण्याच्या प्रवासातील एक लक्षणीय पाऊल आहे आणि सर्जनशीलपणे रचना केलेली राहणीची ठिकाणे एनआरआय ग्राहकांपर्यंत नेण्याचे आम्हाला समाधान आहे.”
दुबईमधील नवीन कार्यालयासह, व्हीटीपी रिअल्टीचे उद्दिष्ट जीसीसी क्षेत्रातील वैविध्यपूर्ण ग्राहकवर्ग, जागतिक नागरिक आणि एनआरआय ग्राहकांना अद्वितीय गुंतवणूक संधी उपलब्ध करून देणे आहे. ब्रँडचे प्रकल्प केवळ बांधकामापलिकडे जाऊन उत्कृष्ट जीवनशैलीचा अनुभव देणारे, अलिशान, उद्देशपूर्ण आणि गुणवत्तेची निष्ठा जपणारे असतात.
व्हीटीपी रिअल्टीचा हा जागतिक विस्तार केवळ व्यवसायिक नाही तर पुण्याच्या सुप्त सामर्थ्याचे प्रदर्शन करणारा उपक्रम आहे. हे पाऊल स्थानिक ब्रँडसाठी जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडू शकते, हे दाखवते. आखाती देशांमधील भारतीयांना या प्रवासात सामील होण्यासाठी व्हीटीपी रिअल्टीने आवाहन केले आहे.