कोरोना नियमांचे पालन करून गणेशोत्सव शांततेत विसर्जन करण्याचे आवाहन – पोलीस नि. यशवंत जाधव.

कोरोना नियमांचे पालन करून गणेशोत्सव शांततेत विसर्जन करण्याचे आवाहन - पोलीस नि. यशवंत जाधव.

कोरोना नियमांचे पालन करून गणेशोत्सव शांततेत विसर्जन करण्याचे आवाहन – पोलीस नि. यशवंत जाधव.

उस्मानाबाद, कळंब: गणेशोत्सवाला गणेश चतुर्थी पासून म्हणजेच 10 सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे हा सण 19 सप्टेंबर 2021 रोजी म्हणजेच अनंत चतुर्थी पर्यंत चालणार आहे, या दहा दिवसासाठी गणपतीची पूजा केली जाते हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, गणेशोत्सवाचे दहा दिवस संपायला आले आहेत त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची तयारी आता पूर्ण झाली आहे, याच पार्श्वभूमीवर कळंब पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात दिनांक 17 /09 2021 रोजी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी दंगा काबू पथकाची रंगीत तालीम शहरात घेण्यात आली.

शहरात सलग दुसऱ्या वर्षी कोरोना च्या पार्श्‍वभूमीवर होत असलेल्या गणेश उत्सवा दिवशी शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे, शहरातील सोनार लाईन,आंबेडकर चौक ,छत्रपती शिवाजी महाराज चौक,साठे चौक,सावरकर चौक, होळकर चौक, कथले चौक, गांधीनगर, बसस्थानक इत्यादी ठिकाणाहून पोलिसांचा लॉंग मार्च काढण्यात आला.

कळंब पोलिस ठाणे अंतर्गत शहरी व ग्रामीण भागामध्ये 26 गणेश मंडळांनी गणेश मूर्तींची स्थापना केलेली आहे, गणेशोत्सव -2021 शांततेच्या मार्गाने पार पाडण्याकरिता पोलीस स्टेशन कळंब च्या वतीने सर्व तयारी केलेली आहे.

कोरोना नियमांचे पालन करून गणेशोत्सव शांततेत विसर्जन करण्याचे आवाहन - पोलीस नि. यशवंत जाधव.

रूट मार्च दरम्यान लोकांमध्ये जनजागृती करून लोकांना कोरोना नियमांचे पालन करून गणेशोत्सव शांततेत विसर्जन करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक यशवंत जाधव पोलीस स्टेशन कळंब यांनी केले, रूट मार्च व दंगा काबू योजनेकरिता सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. ए. डी पवार, ए. वाय पाटील, के. बी. दराडे तसेच 35 पोलीस अंमलदार व 26 होमगार्ड हजर होते.