आवृत्ती , पुणे

म्युनिशन इंडियाच्या कार्यकारी संचालकासह तिघांना अटक

घरझडतीत मिळाले २ कोटी २३ लाख रुपये; सीबीआयची कारवाई, संरक्षण दलाची संवेदनशील माहिती उघड केल्याचा संशय महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) लाचखोरीच्या एका प्रकरणात पुण्यात मुख्यालय असलेल्या म्युनिशन इंडिया लिमिटेड या संरक्षण क्षेत्रातील कंपनीच्या कार्यकारी संचालकासह दोन खासगी व्यक्तींना अटक केली आहे. कार्यकारी संचालकाच्या घरी सीबीआयने झडती घेतली असता, तब्बल १ … Read more

पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने ६ जणांची फसवणूक

सफाई कामगार म्हणून नोकरी लावण्याच्या नावाखाली १३ लाख ७२ हजार रुपये घेतले; कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे महापालिकेत सफाई कामगार म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सहा जणांची १३ लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सचिन बबन भालेराव (वय ४३, रा. जगतापनगर, थेरगाव गावठाण) … Read more

स्काय एंटरटेनमेंटतर्फे ‘बॉलिवूड दांडिया २०२६’चा भव्य जल्लोष

यश लॉन्स, बिबवेवाडी येथे दांडियाची शानदार रात्र : न्याती ग्रुप टायटल स्पॉन्सर, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मीडिया पार्टनर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नवरात्रोत्सवाच्या उत्साहात पुणेकरांना दांडियाचा अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी स्काय एंटरटेनमेंटतर्फे ‘बॉलिवूड दांडिया २०२६’ या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी बिबवेवाडी येथील यश लॉन्समध्ये हा दांडिया महोत्सव रंगणार आहे. … Read more

५ वर्षे फरार गुन्हेगार आंध्र प्रदेशातून जेरबंद

मोक्का कारवाईनंतर होता फरार :  गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वारजे परिसरात गुंडगिरी करून दहशत पसरवणाऱ्या आणि भररस्त्यात जबरी चोरी करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी मोक्का कारवाई केली होती. टोळीतील पाच जणांना अटक करण्यात आली होती. मात्र, टोळीतील एक गुंड गेल्या पाच वर्षांपासून फरार होता. गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या … Read more

तरुणावर कोयत्याने वार करून निर्घृण खून

वढू खुर्द येथील घटना : लोणीकंद पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांना घेतले ताब्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दोन वर्षांपूर्वी मारहाण केल्याच्या रागातून एका अल्पवयीन मुलाने दोन साथीदारांच्या मदतीने तरुणावर कोयत्याने सपासप वार करून त्याचा निर्घृण खून केला. लोणीकंद पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. विकासकुमार अनुपकुमार श्रीवास्तव (वय २१, रा. कोरेगाव भीमा) असे खून … Read more

अल्पवयीन मुलाच्या डोक्यात वार करून खुनाचा प्रयत्न

एकमेकांकडे पाहण्यावरून वाद : भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांवर केला गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या चौघांमध्ये एकमेकांकडे पाहण्यावरून वाद झाला. त्या रागातून एकाने कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेत शुभम गणेश करपेवार (वय १७, रा. शिवांजली निवास, … Read more

घरफोडी करणारे महिलेसह तिघे चोरटे गजाआड

नर्‍हे पोलिसांची कामगिरी : सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याप्रकरणी नर्‍हे पोलिसांनी एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढून ही कारवाई … Read more

वाचनातूनच ज्ञानसमृद्ध आणि संस्कारक्षम पिढी घडते

शंकरराव पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : वाचन ही केवळ ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया नसून व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्ली आहे. पुस्तकांच्या सहवासातून विचारांना दिशा मिळते, कल्पनाशक्तीला चालना मिळते आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्यात ज्ञानाची ओढ वाढावी, या उद्देशाने भूम येथील … Read more