आवृत्ती , पुणे

गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ वकिलाला १४ कोटींना गंडा

पूर्वी व्यवहार केलेल्या गुंतवणूक कंपनीच्या नावाने संपर्क साधून केली फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : २०१८ पूर्वी ज्या फर्ममार्फत त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली होती, त्याच कंपनीतून बोलत असल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ वकिलाला तब्बल १४ कोटी २५ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत नारायण पेठेत राहणाऱ्या एका ६८ वर्षांच्या ज्येष्ठ … Read more

प्रीतम प्रकाश महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ संपन्न

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या २१४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : भोसरी येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न प्रीतम प्रकाश महाविद्यालय येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रामार्फत आयोजित पदवीप्रदान समारंभ पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. या समारंभात बी.ए., बी.कॉम., एम.ए. (मराठी, अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, इंग्रजी), … Read more

गर्भलिंगनिदान करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

बीएएमएस डॉक्टर एजंटच्या मदतीने करत होता गर्भलिंग निदान : रांजणगाव येथील लाईफ केअर क्लिनिकवर छापा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रांजणगाव येथील लाईफ केअर क्लिनिकवर पोलिसांनी छापा घालून बेकायदेशीर गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश केला. बीएएमएस डॉक्टर महिला पेशंटची छोट्या प्रोबद्वारे, जो मोबाईलला वायफायने कनेक्ट करून मोबाईल अ‍ॅपद्वारे सोनोग्राफी करत होता, तेव्हा पोलिसांनी त्याला पकडले. आकाश … Read more

२ हजार ८२२ कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर कारवाई

वाहतूक पोलिसांकडून मोटारसायकल चालकांवर २८ लाख १७ हजार रुपयांचा दंड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर लावून नागरिकांना त्रास देणाऱ्या २ हजार ८२२ बुलेट व इतर मोटारसायकलींवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. फेब्रुवारी महिनाभरात ही कारवाई करण्यात आली. या मोटारसायकल चालकांवर २८ लाख १७ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, त्यापैकी २३ … Read more

डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माण महाविद्यालयात भव्य माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त तीनशेहून अधिक माजी विद्यार्थ्यांचा सहभाग : नेटवर्किंग व करिअर मार्गदर्शनावर भर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने भव्य माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विविध बॅचमधील माजी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा मेळावा स्नेह, आठवणी आणि संवादाने भरलेला अविस्मरणीय सोहळा … Read more

प्रकल्प प्रदर्शनातून विद्यार्थीमधील कलाकौशल्य व संघभावना विकसित

आर्कि. आशिष सचदे यांचे प्रतिपादन : ‘सूर्यदत्त’ संचालित पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड टेक्नॉलॉजीतर्फे ‘ऑरा २०२६’ प्रदर्शन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विद्यार्थ्यांनी भवताल समजून घेत नाविन्यपूर्ण, कलात्मक व शाश्वत विकासाच्या कल्पनांवर काम करावे. प्रकल्प प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील कलाकौशल्य, सर्जनशीलता आणि संघभावना विकसित होण्यास मोठी मदत होते, असे प्रतिपादन नामवंत आर्किटेक्ट आर्कि. आशिष सचदे यांनी केले. … Read more

बार्शी शहरात धार्मिक स्थळांवरील अनधिकृत ध्वनीप्रक्षेपकांवर कारवाई

२८ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान ४० भोंगे जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी शहर पोलीस ठाणे हद्दीत दि. २८ फेब्रुवारी २०२६ ते दि. १ मार्च २०२६ या कालावधीत धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंग्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली. ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवणे, मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करणे तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे … Read more

डोकेवाडी गावात लोकसहभागातून उभारला भव्य खुला सभामंडप

सुशिक्षित तरुणांच्या पुढाकाराने अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून गावासाठी ऐतिहासिक कार्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : भूम तालुक्यातील डोकेवाडी गावात सुशिक्षित तरुणांच्या संघटित प्रयत्नातून आणि गावकऱ्यांच्या लोकसहभागातून भव्य खुल्या सभामंडपाची उभारणी करण्यात आली असून, हे सभामंडप धार्मिक, सामाजिक व कौटुंबिक कार्यक्रमांसाठी गावकऱ्यांना मोठा आधार ठरणार आहे. गावातील तरुण मंडळी एकत्र आली तर कोणतेही मोठे कार्य शक्य … Read more