आवृत्ती पुणे

फसवणूक व अपहार प्रकरणी मराठे ज्वेलर्सच्या मालकांना अटक

आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई : कौस्तुभ मराठे व मंजिरी मराठे पोलिसांच्या ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई करत मराठे ज्वेलर्सचे कौस्तुभ मराठे व मंजिरी मराठे यांना फसवणूक व अपहार प्रकरणी अटक केली आहे. त्यांच्यावर आतापर्यंत ५ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पुणे शहरातील मराठे ज्वेलर्स व प्रणव … Read more

उड्डाणपूलाला दुचाकी धडकल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

वारजे-रामनगरमधील घटना : अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कर्वेनगर येथे उड्डाणपूलाला दुचाकी धडकल्याने दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ते दोघे वारजे रामनगर परिसरातील रहिवाशी आहेत. बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. शंकर इंगळे (वय २२ रामनगर), सलील इस्माईल … Read more

बँक गैरव्यवहारप्रकरणी पुरवणी दोषारोपपत्र दाखल

आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई : कोर्टापुढे तब्बल ७३८० पानांचा दस्तऐवज सादर महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे ः शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने कोर्टापुढे तब्बल ७३८० पानांचे पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले आहे. या गैरव्यवहारात एकूण ४९६ कोटी ४४ लाख रुपयांचा अपहार झाला आहे. शिवाजीराव भोसले सहकारी बँक लि, शिवाजीनगर, पुणे या बँकेच्या फसवणूक/अपहाराच्या … Read more

नियोजीत पत्नीला मारण्याचा प्रयत्न करणारा जेरबंद

कोंढवा येथील धक्कादायक घटना : जेवणास फार्म हाऊसवर नेऊन केले कृत्य महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : नियोजित पत्नीने दिलेले ११ लाख रुपये परत मागू नये, तसेच त्याच्याशी लग्न करु नये, म्हणून तरुणीला जेवायला नेण्याच्या बहाण्याने बंद फार्म हाऊसवर नेऊन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका तरुणाला अटक … Read more

बायका-मुलांना रस्त्यावर आणण्याची धमकीने तरुणाची आत्महत्या

कोंढव्यातील प्रकार : व्याज म्हणून दरमहा 50 हजार रुपये देत असतानाही दिली धमकी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : फ्लॅट खरेदी करण्यासाठी दिलेल्या पैशाचे व्याज म्हणून दर महा ५० हजार रुपये देत असतानाही बायका मुलांना रस्त्यावर आणण्याची धमकी देऊन मित्रानेच त्रास दिल्याने तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार २०१९ पासून ५ ऑगस्ट २०२० दरम्यान … Read more

दुर्देवी ! शेततळ्यात बुडून माय-लेकींचा मृत्यू

बारामतीमधील अंजनगावातील प्रकार : सुदैवाने एक मुलगी वाचली महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बारामती : अंजनगाव (ता. बारामती, जि. पुणे) येथे पिण्यासाठी पाणी काढत असताना शेततळ्यात पाय घसरून पडल्याने माय-लेकींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर, पाण्यात पडलेल्या तिघींपैकी एक मुलगी सुदैवाने वाचली आहे. ही घटना मंगळवारी (14 सप्टेंबर) रोजी घडली. अश्विनी सुरेश लावंड (वय, 36) … Read more

नवले ब्रीजवर टेम्पो ट्रॅव्हलरच्या धडकेत महिलेचा मृत्यू, नात जखमी

पुण्यातील दुर्दैवी घटना : वारजे पोलीस स्टेशनमध्ये चालकाविरुद्ध फिर्याद दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क भरधाव वेगात जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरची धडक एका दुचाकीला बसली. यामध्ये नात आणि आजी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात पुण्यातील नवले ब्रीजवर सोमवारी (दि.13) रात्री पावणे दहाच्या सुमारास झाला होता. … Read more

तरूणीच्या अंगावर ॲसिड टाकल्याप्रकरणात जामीन

बोपदेव घाटात घडला होता प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बोपदेव घाटात तरूणीच्या अंगावर ॲसिड टाकून जखमी केल्याप्रकरणात एकाला विशेष न्यायाधीश व्ही.ए.पत्रावळे यांनी 25 हजराचा जामीन मजुर केला आहे. दीनेश श्रीपत धुमक (वय 39, रा. बावधन) असे त्याचे नाव आहे. पोलिसांचा तपास पूर्ण झाला आहे. तिला किरकोळ दुखापत झालेली आहे. त्यामुळे भादवी कलम 326 (अ) लागू … Read more

पत्नीच्या मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करून चोरली वैयक्तीक माहिती

कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये पतीविरूद्ध गुन्हा : कोथरूड-बाणेर परिसरातील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या मोबाईलवर स्पाय अँड रेकॉर्डर नावाचे ॲप घेऊन नजर ठेवली. त्यानंतर पत्नीची वैयक्तीक माहिती चोरून तिचा गैरवापर केला. ही घटना कोथरूड परिसरात समोर आली आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात 37 वर्षीय पतीच्या विरोधात आयटी ॲक्ट व विनयभंगाचा गुन्हा … Read more

महिलांचे मोबाईल फोन हिसकवणारी आंतरराज्यीय टोळी अखेर जेरबंद

विमानतळ पोलिसांची कामगिरी : चौदा मोबाईलसह अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : महिलांचे मोबाईल फोन हिसकवणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस जेरबंद करण्यात विमानतळ पोलिसांना यश मिळाले असून, याप्रकरणी चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चौदा मोबाईल, दोन मोटारसायकलींसह अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुणे शहर व पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात मोबाईल स्नॅचिंगच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने … Read more