कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : शिलाविहार कॉलनीतील प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
कोथरूडमधील इलेक्ट्रिक दुकानामध्ये काम करणाऱ्या दोघांनी चार लाख ४० हजार रुपयांचे ४४० फॅनची परस्पर विक्री केली. ही घटना फेब्रुवारी २०२१ ते १४ सप्टेंबर २०२१ दरम्यान घडली.
अजित नहार (वय ५५, रा. कर्वेनगर, पुणे) यांनी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगिले की, फिर्यादीचे शिलाविहार कॉलनीमध्ये धनलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये इलेक्ट्रिकल दुकान आहे.
या दुकानातून फेब्रुवारी २०२१ ते १४ सप्टेंबर २०२१ दरम्यान दुकानातील दोन कामगारांनी दुकानाच्या गोडावूनमधून सुमारे चार लाख ४० हजार रुपयांचे चार फॅनचा एक बॉक्स असे ११० बॉक्समधील ४४० सिलिंग फॅनची परस्पर विक्री केली. दुकानातील फॅनच्या बॉक्समध्ये तफावत आढळून आल्यानंतर ही बाब निदर्शनास आली.
पुढील तपास कोथरूड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रतिकांत कोळी करीत आहेत.















