बोपदेव घाटात घडला होता प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
बोपदेव घाटात तरूणीच्या अंगावर ॲसिड टाकून जखमी केल्याप्रकरणात एकाला विशेष न्यायाधीश व्ही.ए.पत्रावळे यांनी 25 हजराचा जामीन मजुर केला आहे.
दीनेश श्रीपत धुमक (वय 39, रा. बावधन) असे त्याचे नाव आहे. पोलिसांचा तपास पूर्ण झाला आहे. तिला किरकोळ दुखापत झालेली आहे. त्यामुळे भादवी कलम 326 (अ) लागू होत नसल्याचा युक्तीवाद बचाव पक्षातर्फे ॲड. हेमंत कांबळे आणि ॲड. हर्षवर्धन थोरात यांनी जामिनाची मागणी केली होती.
धुमक 37 वर्षीय फिर्यादीला 1 मे 2021 रोजी त्याच्या दुचकीवर बसवून बोपदेव घाट येथे घेऊन गेला. रस्त्यावर गाडी थांबविली. कामाचे ठिकाण दाखवण्याची मागणी केली. मात्र, त्यास तिने नकार दिला. त्यावेळी तिला तोंडावरील मास्क काढण्यास सांगितला. सोबत आणलेले बाटलीतील ॲसिड तिच्या तोंडावर, अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला. त्यातील ॲसिड पडल्याने डावा डोळ्याच्या वर आणि डाव्या दंडावर भाजून तरूणी जखमी झाल्याचे कोंढवा पोलिसात दाखल फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या धुमक याच्या वतीने ॲड. हेमंत कांबळे आणि ॲड. हर्षवर्धन थोरात यांनी जामिनासाठी अर्ज केला.
