कोंढव्यातील प्रकार : व्याज म्हणून दरमहा 50 हजार रुपये देत असतानाही दिली धमकी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : फ्लॅट खरेदी करण्यासाठी दिलेल्या पैशाचे व्याज म्हणून दर महा ५० हजार रुपये देत असतानाही बायका मुलांना रस्त्यावर आणण्याची धमकी देऊन मित्रानेच त्रास दिल्याने तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार २०१९ पासून ५ ऑगस्ट २०२० दरम्यान घडला. सचिन काळभोर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी त्यांची पत्नी कामिनी काळभोर (वय ३५, रा. पिसोळी) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. कोंढवा पोलिसांनी सुहास ननावरे (रा. धायरी) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन काळभोर आणि सुहास ननावरे हे दोघे मित्र होते. सचिन काळभोर यांनी फ्लॅट खरेदी करण्यासाठी सुहास ननावरे याच्याकडून ५ लाख रुपये व्याजाने घेतले होते. व्याज म्हणून काळभोर दरमहा ५० हजा रुपये आरोपीला देत होते. असे असतानाही पैशासाठी आरोपी काळभोर यांना शिवीगाळ करुन मुलाबाळांना व बायकोला रस्त्यावर आणण्याची धमकी देत. तसेच सचिन काळभोर यांना मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून सचिन काळभोर यांनी ५ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
