खडक पोलिसांत फिर्याद : देवदर्शनाला गेल्यानंतर चोरट्याने मारला डल्ला
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि दीड लाख रुपये रोख रकमेवर चोरट्याने डल्ला मारला. चोरी लपविण्यासाठी घराला आग लावून दिली. ही घटना देवदर्शनाला गेल्यानंतर २ ते ७ मे २०२२ दरम्यान रेडियन्स प्रगती, महात्मा फुले पेठ येथे घडली.
अशोक भोई (वय ६९, रा. महात्मा फुले पेठ, पुणे) यांनी खडक पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी देवदर्शनासाठी घराला कुलूप लावून गेले. त्याच दरम्यान चोरट्याने कुलूप तोडून सोन्याचे दागिने, दीड लाख रुपये रोख, मूळ प्रॉपर्टीचे व इतर कागदपत्रे असा एकूण दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरी लपविण्यासाठी चोरट्याने घराला आग लावली, त्यामध्ये ५० हजार रुपयांचे घराचे नुकसान झाले. खडक पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहुल जोग पुढील तपास करीत आहेत.
