हडपसर पोलिसांत फिर्याद : फुरसुंगीतील तरवडेवस्ती येथे घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून कोयत्याने वार करून गंभीर जखमी करणाऱ्यावर हडपसर पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना फुरसुंगीतील तरवडेवस्ती येथे ११ मे २०२२ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.
सोमनाथ कामठे (वय ४२, रा. तरवडेवस्ती, फुरसुंगी, जि. पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी राहते घरी असताना आरोपीने तू मला दारू पिण्याकरिता आताचे आता पैसे दे असे सांगितले. त्यावर फिर्यादीने माझ्याकडे आता पैसे नाहीत, असे सांगितल्याच्या रागातून आरोपीने शिवीगाळ करून तू मला पैसे कसे देत नाही हेच बघतो, असे म्हणून घरातील ऊसतोडणीच्या कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. हडपसर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक तृप्ती खळदे पुढील तपास करीत आहेत.
