मोक्का गुन्ह्यातली टोळी जेरबंद, समर्थ पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : येथील आंदेकर टोळीतील मोक्का गुन्ह्यातून जामिनावर सुटलेल्या आरोपींनी, भर दिवसा हत्याराने वार करत फिर्यादीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. हल्ल्यानंतर ते पळून गेले. समर्थ पोलिस स्टेशनमध्ये फिर्यादी अरबाज शेख याने तक्रार दाखल केली होती.
हल्ला करून पळून जाणाऱ्या आरोपींचा शोध घेताना तपास पथकाचे पोलिस नाईक रहिम शेख व पोलिस शिपाई हेमंत पेरणे यांना मिळालेल्या खबरीनुसार आरोपींचा ठावठिकाणा कळल्यानंतर सापळा रचून आरोपी आवेज शेख, वय वर्ष 20, रा.गणेशपेठ, अमन पठाण उर्फ खान, वय 22 वर्षे, नानापेठ, स्वप्नील शिंदे, वय 18 वर्षे, धनकवडी या टोळीला अवघ्या पाच तासात अटक केली आहे. ही कामगिरी पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, परिमंडळ 1 चे पोलिस उप आयुक्त संदीपसिंह गिल्ल, फरासखाना विभाग सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक धुमाळ, समर्थ पोलिस स्टेशन वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक सुनील रणदिवे, पोलिस हवालदार रोहिदास वाघिरे, गणेश वायकर, प्रमोद जगताप, पोलिस नाईक रहिम शेख, पोलिस शिपाई, कल्याण बोराडे, अमोल शिंदे, शरद घोरपडे, संदीप पवार, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, हेमंत पेरणे, लखन शेटे यांनी केली.