महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शहरातल्या पोलिस उपआयुक्त परिमंडळ 5 कार्यक्षेत्रातल्या सहायक पोलिस आयुक्त वानवडी विभाग, हडपसर विभागातल्या विविध पोलिस स्टेशन क्षेत्रात ऑल आउट ऑपरेशन व कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. यामध्ये सर्व प्रकारच्या गुन्ह्यातल्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली.
या भागात तपास पथक प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक विजय चंदन, पोलिस उप निरीक्षक रविंद्र ढावरे यांच्यासह पेट्रोलिंग करताना पोलिस नाईक अकुंश जोगदंडे खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. दरोड्याच्या तयारीत असलेल्या उमेश गायकवाड, वय 30 वर्षे, रा. हडपसर, सूर्यकांत रासगे वय 42 वर्षे, रा. मुंढवा, संतोष गायकवाड, वय 37 वर्षे, रा. केशवनगर, मुंढवा, नीतिन जाधव, वय 29 वर्षे, रा. मुंढवा. शेखर गायकवाड, वय 58, मुंढवा अशा पाच जणांना या पथकाने अटक केली.
त्यांच्याकडून दरोड्याच्या हत्यारासह दोरी, मिरची पूड जप्त करण्यात आले. अधिक चौकशी केली असता वाघोली रस्त्यावरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले. या पाचही आरोपींवर विमानतळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा तपास सुरू आहे. वरील कामगिरी पुणे शहर पूर्व प्रादेशिक विभागाचे पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलिस उपआयुक्त शशिकांत बोराटे, सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे, पोलिस निरीक्षक संगीता माळी, सहायक पोलिस निरीक्षक विजय चंदन, पोलिस उपनिरीक्षक रविंद्र ढावरे, पोलिस अंमलदार अविनाश शेवाळे, अकुंश जोगदंड, सचिन कदम, रूपेश पिसाळ, सचिन जाधव, नाना कर्चे, गिरीष नाणेकर, योगेश थोपटे, विशाल निलख, दादा बर्डे, ज्ञानेश्वर आवारी यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.