महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शहरातील पोलिस उपआयुक्त परिमंडळ 5 च्या कार्यक्षेत्रात होणाऱ्या जबरी चोऱ्या, वाहन चोऱ्या आणि घरफोडीचे 28 गुन्हे उघडकीस आणले. हडपसर, कोंढवा, मुंढवा, लोणी काळभोर, वानवडी पोलिस स्टेशन चे तपास पथकाचे अधिकारी, अंमलदार यांनी सराईत गुन्हेगारांना जेरबंद करत गुन्हे उघड केले.
पुणे शहर पोलिस आयुक्तालयातल्या परिमंडळ 5 क्षेत्रातल्या हडपसर, कोंढवा, मुंढवा, लोणी काळभोर, वानवडी तसेच परिमंडळ 4 मधील विमानतळ, येरवडा पोलिस स्टेशन कडील जबरी चोरीचे 12, घरफोडीचे 6 आणि वाहन चोरीचे 9 गुन्हे उघडकीस आणले आहेत.
या गुन्ह्यातला चोरीला गेलेला 13 लाख 73 हजार रूपये किंमतीचा मालही चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आला.
वरील कारवाई पुणे शहर पोलिस आयुक्त रितेशकुमार, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस अयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, परिमंडळ 5 चे पोलिस उपआयुक्त विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुचनांप्रमाणे करण्यात आली. यामध्ये वानवडी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त शाहुराजे साळवे, हडपसर विभागाचे सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख यांनी तसेच त्यांच्या विभागीय पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी, पोलिस अधिकारी, पोलिस अंमलदार यांच्यासमवेत पार पाडली.