प्रणव शिंदे जेरबंद: सहकारनगर पोलिसांची कामगिरी
पुणे : संकेत डुंगरवाल
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
सहकारनगर पोलिस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर प्राणघातक हल्ला करणारा संशयित आरोपी प्रणव शिंदे याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम करीत आहेत.
सहकारनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना खबर्यांकडून मिळालेल्या माहितीवरून त्यांनी संबंधित संशयित आरोपीस सापळा रचून पकडले आहे. प्रणव प्रकाश शिंदे (वय 23, सध्या रा. दीपज्योती कॉलनी, कर्वेनगर, पुणे) असे आरोपीचे नाव असून, तो सहकारनगर पोलिस स्टेशनकडील रेकॉर्डवरील गुन्हेगारावर प्राणघातक हल्ला करणारा संशयित आहे. तो परिसरात नाव बदलून वावरत होता. त्याच्या नावाने हाक मारताच त्याने मागे वळून पाहताच, त्यास ताब्यात घेण्यात आले. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र कदम हे करीत आहेत.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, पुणे प्रादेशिक विभागाचे डॉ. संजय शिंदे तसेच सागर पाटील, सर्जेराव बाबर, गोविंद गंभीरे, राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे, हवालदार बापू खुटवाड, विजय मोरे, पोलीस नाईक सतीश चव्हाण, प्रकाश मरगजे, मनोज निर्मळे, भुजंग इंगळे, संदीप ननवरे, पोलीस शिपाई महेश मंडलिक,
सचिन फुंदे, प्रदीप बेडिस्कर यांच्या पथकाने केली.
