विमाननगरमधील घटना : अपघातानंतर दुचाकीचालक गेला पळून
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : एअरपोर्ट रोडवर पादचाऱ्यास दुचाकी जबर ध़डक बसून अपघात झाला. या अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू झाला. रविवारी (दि. २२ ऑगस्ट) दुपारी साडेबाराच्या सुमारास ५०९ चौकाजवळील नर्सरीसमोर एअरपोर्ट रोडवर ही घटना घडली. अपघातानंतर दुचाकीचालक पळून गेला.
बसुराज भिमाशंकर आरेनोर (वय ४९) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे नाव आहे.
याप्रकरणी उमेश आरेनोर (वय २४, रा. लोहगाव रोड, पुणे) यांनी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात दुचाकीचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचे डिल बसुराज भिमाशंकर आरेनोर ५०९ चौकाजवळल नर्सरीसमोर एअरपोर्ट रोड येथून पायी जात होते. त्यावेळी दुचाकीची धडक बसून अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर दुचाकीचालक पळून गेला. विमाननगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक एम. एस. पाठक पुढील तपास करीत आहेत.
