वाघोलीतील भावडी रोडवरील घटना
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
ज्येष्ठ नागरिक कामाच्या ठिकाणी दुचाकीवर भावडी रोड (वाघोली, ता. हवेली) वरून जात होते. त्यावेळी त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी दगडावर आदळली. त्यामध्ये दुचाकीचालक गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
बबन अच्युतराव मोहिते (वय ७२, रा. जाधववस्ती, भावडी रोड, वाघोली, पुणे) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.
पोलीस शिपाई साईनाथ गोपीनाथ रोकडे यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, अपघातात मृत्युमुखी पडलेले बबन मोहिते दुचाकीवरून कामाच्या ठिकाणी भावडी रोडने जात होते. त्यावेळी त्यांचे दुचाकीचे नियंत्रण सुटून दगडावर आदळल्याने गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास लोणीकंद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक खोसे पुढील तपास करीत आहेत.















