सोलापूर ग्रामीण एल.सी.बी.ची कामगिरी : 14 आरोपींसह 68 हजारांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
सोलापूर :मौजे मुळेगाव तांडा (ता. दक्षिण सोलापूर) येथील जुगार अडयावर सोलापूर ग्रामीण एल.सी.बी. छापा टाकला असून 14 आरोपींसह एकूण 68 हजार 770 रुपयॆ किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याबाबत ए.ल.सी.बी.चे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी विशेष पथके तयार करून प्रभावी कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत, मौजे मुळेगाव तांडा (ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) येथील चिंतामणीनगर येथे अवैध जुगार अड्डा सुरू असल्याबाबत बातमी मिळाली.
पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी बातमीप्रमाणे कारवाई करण्याकरिता पोलीस उपनिरीक्षक अमित सिद-पाटील आणि त्यांच्या पथकास कारवाई करण्याकरीता आदेश दिले. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक अमित सिद-पाटील व त्यांचे पथक मौजे मुळेगाव तांडा (ता. दक्षिण सोलापूर जि. सोलापूर) येथे जाऊन बातमीप्रमाणे खात्री केली असता, चिंतामणी नगर येथे पत्राशेडमध्ये जुगार अड्डा सुरू होता. तेथे कारवाई करून 14 इसमांना ताब्यात घेऊन त्यांचेकडून एकूण 68,770/- रुपये, त्यात रोख रक्कम व मोबाईल जप्त केले आहेत. सदर बाबत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी ही, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एल.सी.बी.चे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित सिद-पाटील, सहपोलीस फौजदार शिवाजी घोळवे, बिरुदेव पारेकर, श्रीकांत गायकवाड, पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन वाकडे, प्रकाश कारटकर, दिलीप राऊत, सलीम बागवान, हरिदास पांढरे, मंजुळा धोत्रे, पोलीस नाईक रवी माने, ज्योती काळे, अनिसा शेख, पोलीस कॉन्स्टेबल सचिन गायकवाड, अजय वाघमारे, राहुल सुरवसे यांनी केली आहे.
