येरवड्याला मिळणार नवीन अधिक्षक : जेलमध्ये केले अनेक बदल
पुणे महाराष्ट्र 360 न्यूज
पुणे येरवडा जेलचे अधिक्षक यु. टी. पवार यांची तळोजा मध्यवर्ती कारागृह मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. मागील दहा वर्षापासून यु.टी.पवार हे येवरडा जेलचे अधिक्षक होते.
कोरोना काळात अतिक्षमतेने भरलेल्या जेलमध्ये एकही कैद्याला कोरोना होऊ न देणारा अधिकारी म्हणून पवार यांचे विशेष कौतुक होत आहे.जेलमध्ये अनेक बदल त्यांच्या काळात झाले.मानवअधिकार कायद्याप्रमाणे कैद्यांना ज्या सुविधा मिळायला हव्या आहेत त्या सुविधा पवार यांच्या काळात सुरू झाल्या.कैद्यांना शिक्षा भोगल्या नंतर आपले आयुष्य चांगल्या पद्धतीने जगता यावे यासाठी पवार यांनी विशेष प्रयत्न केले.
जेल मध्ये कैद्याचे मानसीक आरोग्य चांगले रहावे यासाठी देखील त्यांनी नेहमी पुढाकार घेत विविध कार्यक्रम आयोजन केले. तुरुंगातील आपल्या सर्व सहकार्याना आपुलकीची वागणुक देणारा अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकीक आहे.अनेक अतिरेकी,गुंड तसेच कलावंत,उद्योगपती कैदी म्हणून त्यांच्या काळात जेल मध्ये होते.
अतिशय शिस्तप्रिय अधिकारी व जेल म्हणजे माझे कुटुंब असे मानणारा अधिकारी म्हणजे यु.टी.पवार साहेब.

 
			





















