चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पाषाणमधील एनसीएल कॉलनीतील चंदनाची दहा झाडे चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना २१ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी सातच्या सुमारास निदर्शनास आली. चोरट्यावर वृक्ष संवर्धन आणि जनत कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.
पराग चिटणवीस (वय ५३, रा.पाषाण रोड, पुणे) यांनी चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी पाषाणमधील एनसीएलमध्ये वरिष्ठ सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कॉलनीतील १० चंदनाची झाडे चोरून नेली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन राजीव फडतरे यांच्या साक्षीने पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार इरफान मोमीन करीत आहेत.

 
			


















