भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई : ८९ हजार ८०० रुपयांचा ऐवज जप्त
पुणे : महाराष्ट्र ३६०न्यूज नेटवर्क
गावठी रिव्हॉल्व्हर व काडतुसे अशी प्राणघातक हत्यारे जवळ बाळगणाऱ्या तिघांना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून देशी बनावटीचे (अग्निशस्त्र) व पितळी धातूची दोन काडतुसे, एक काळ्या रंगाची एअर गन अशी प्राणघातक हत्यारे व एक मोटारसायकल असा एकूण ८९ हजार ८०० रुपयांचा जप्त केला आहे.
सौरभ रामचंद्र सोळसकर (वय २२, रा. स.नं.२३-१०, बालाजीनगर, पुणे), शुभम आबा कसबे (वय २१), दत्तात्रय राजाराम पाटोळे (वय १९, दोघे रा. खोपडेनगर, गुजर-निंबाळकरवाडी रोड, कात्रज, पुणे) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. तिघांवरही आर्म अॅक्टनुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमधील तपास पथकाचे अधिकारी अंकुश कर्चे व अंमलदार हद्दीमध्ये रात्री गस्त घालत होते. त्यावेळी नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीवर तीन संशयित दिसून आले. त्यांना तपासासाठी हटकले असता ते पळून जाऊ लागले. मात्र, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतले. सौरभ सोळसकर याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे देशी बनावटीचे (अग्निशस्त्र) व पितळी धातूची दोन काडतुसे, शुभम कसबे याच्याकडे एक काळ्या रंगाची एअर गन अशी प्राणघातक हत्यारे व एक मोटारसायकल असा एकूण ८९ हजार ८०० रुपयांचा जप्त केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे करीत आहेत.
पोलीस उपायुक्त सागर पाटील, पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगीता यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, अंकुश कर्चे, अंमलदार रवींद्र भोसले, रवींद्र चिप्पा, धनाजी धोत्रे, नवनाथ खताळ, सचिन गाडे, शिवदत्त गायकवाड, आशिष गायकवाड, विक्रम सावंत, जगदीश खेडकर, दत्तात्रय खेडकर, अमर भोसले, राजू वेगरे, तुळशीराम टेंभुर्णे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
