वानवडी पोलिसांची कारवाई : पोलीस अभिलेखावरील दोघांकडून तीन शस्त्रे ताब्यात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : शहर पोलीस अभिलेखावरील दोघा सराईत आरोपींकडून गावठी कट्टा व जिवंत काडतुसे अशी तीन शस्त्रे ताब्यात घेण्यात आली असून, दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सन २०२१ चे गणेशोत्सवाचे धर्तीवर पुणे पोलीस आयुक्तालयात अंतर्गत मा. सह पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी प्रतिबंधक आदेश व जमाव बंदीचे आदेश लागू असून नागरीकांना सदर काळामध्ये शस्त्रे, हत्यारे व घातक साधने बाळगण्यास मनाई केली असून, त्याबाबत वेळोवेळी प्रसिद्धी देऊन नागरीकांना अवगत करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग वाढविण्यात आली असून, वानवडी पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे सतर्कतेने पेट्रोलिंग करीत असतात. सोमवारी (ता. १३) वानवडी पोस्ट कडील तपास पथकातील पोलीस स्टाफ हा पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार सर्फराज देशमुख यांना त्यांचे बातमीदाराकडून माहिती मिळाली की, पोलीस अभिलेखावरील आरोपी राजू अशोक जाधव व प्रमोद ऊर्फ बारक्या श्रीकांत पारसे हे काळेपडळ भागात आले असून त्यांचेकडे अग्निशस्त्र आहे लागलीच सदर बातमीचे अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांचे मार्गदर्शन व सूचनेनुसार त्यांना काळेपडळ भागात छापा टाकून पकडले असता, आरोपी प्रमोद ऊर्फ बारक्या श्रीकांत पारसे याचेकडून एक गावठी बनावटीचा लोखंडी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले होते. त्यावरून वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून, त्याअन्वये न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपासात आरोपी राजू अशोक जाधव याचेकडून आणखी दोन गावठी बनावटीचे कट्टे जप्त करण्यात आले असून, जप्त अग्निशस्त्रांची एकूण संख्या तीन झाली आहे.
नमुद आरोपींकडून यापूर्वी वेगवेगळे पोलीस ठाण्यांमध्ये ११ गावठी बनावटीची अग्निशस्त्र जप्त करण्यात आली होती, नमुद आरोपींनी यापूर्वी पुरविली व विक्री केले गावठी बनावटीचे अग्निशस्त्रांचा वापर करून मोहम्मदवाडी परीसरातील एका वाळू विक्रेत्यावर गोळीबार करून त्या जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, तर वेल्हा तालुक्यातील दोपोडे येथील व्यावसायिकावर देखील गोळीबार करण्यात आला होता, वरील दोन्ही गुन्ह्यांत आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यावेळी सदर गावठी बनावटीचे कट्टे हे तयार करणारे इसमासदेखील बुलढाणा जिल्ह्यातून अटक करण्यात आली होती. जुलै महिन्याचे मध्यांतरास वरील दोन्ही आरोपी हे तात्पुरत्या स्वरूपात जामिनावर सुटलेले आहेत.
अटक आरोपींकडे केलेले कौशल्यपूर्ण तपासात वरील दोन्ही आरोपींनी त्यांचे इतर साथीदारांसोबत लोणंद एम. आय. डी. सी. मधील एका कंपनीची ५ लाख रुपये कॅश लुटल्याचे सांगितले असता तपासादरम्यान लोणंद पोलीस स्टेशन, सातारा येथे त्याबाबत गुन्हा दाखल असल्याचे दिसून आले आहे. सदर गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल व मोबाईल फोन देखील तपासादरम्यान आरोपींकडून जप्त करण्यात आलेले आहेत. तसेच आरोपींनी बाळगलेली अग्निशस्त्रे ही ते कोणास देण्यास आले होते किंवा त्यांनी कोणाच्या खुनाची सुपारी घेतली आहे काय याबाबत अधिक तपास सुरू आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सावळाराम साळगावकर, यांचे सूचनेनुसार तपासपथकातील सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, फौजदार
संतोष तानवडे, पोलीस अंमलदार, राजू रासगे, संतोष मोहिते, संजय बागल, अमजद पठाण, विनोद भंडलकर, संतोष नाईक, अतुल गायकवाड पोलीस नाईक सर्फराज देशमुख, सागर जगदाळे, शिरीष गोसावी, अमित चिव्हे, दीपक भोईर, गणेश खरात यांचे पथकाने केली आहे.
