टाक एक वर्षासाठी तडीपार होता : स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत दादा समजून केली दहशत
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीत गुलटेकडी येथे राहणारा व स्वतःला भाई, दादा समजून समाजात दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार गोविंदसिंग पापुलसिंग टाक याच्या टोळी विरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्याच्या टोळीने खुनाचा प्रयत्न गैरकायद्याची मंडळी जमवून घातक शस्त्रांसह दरोडा, खंडणी मारामारी, घातक शस्त्रे बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत.
गोविंदसिंग पापुलसिंग टाक (वय 22, रा. डायस प्लॉट झोपडपट्टी गुलटेकडी), राहूल ऊर्फ लल्ल्या संजय कांबळे (वय 20, रा. मंगळवार पेठ), गणेश साहेबराव तुपे (वय 31, रा. मंगळवार पेठजुना भराव वस्ती), ओंकार राजेद्र भुजबळ (वय 22 रा. गणेश पेठ), सुनिल विजय चव्हाण (वय 27, रा. गणेश पेठ), सौरभ उर्फ साहील शिवशरण कांबळे (वय 19, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी ) अशी मोक्का लावण्यात आलेल्यांची नावे आहेत.
टाक यास सन-2019 मध्ये 01 वर्षा करीता स्थानबध्द करण्यात आले होते. कारवाईतून सुटले नंतर पुन्हा त्याने आपले साथीदारांना एकत्र करून खुनाचा प्रयत्न व दुखापतीचे दोन गुन्हे केले आहेत. स्वतःचे व साथीदारांचे उपजिवीके करीता जबरदस्तीने दहशत करून हप्ते वसूली केली आहे. दि.28 सप्टेंबर रोजी गोविंदसिंग पापुलसिंग टाक याने आपल्या साथीदारांचे मदतीन दहशत करून सदर भागातील व्यावसायिकास मारहाण करून जिवे मारणेचा प्रयत्न केला म्हणून स्वारगेट पोलीस ठाणे आर्म ऍक्ट गुन्हा दाखल होता. त्याचे व त्याचे साथीदारांचे दहशती मुळे कोणीही तक्रार करणेस धजावत नसलेचे दिसत असल्याने त्याच्या अशा बेकायदेशीर कृत्यांना आळा घालणे करीता त्याचे विरूध्द सदर गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई होणे बाबतचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांना सादर केला होता.
गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण या करीत आहेत. पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव तसेच सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक अशोक येवले, सहायक फौजदार प्रमोद कळमकर, पोलीस अंमलदार विजय कुंभार, वैभव मोरे, विजय खोमणे, ज्ञानेश्वर बढे, मनोज भोकरे, लखन ढावरे, संदिप साळवे, सोमनाथ कांबळे, फिरोज शेख, शैलेश वाबळे, दिपक खंदाड, सचिन दळवी ऋषीकेश टिटमे, गोडसे सर्व स्वारगेट पोलीस ठाणे यांचे पथकाने केली आहे.