उपवनसंरक्षक राहुल पाटील यांची माहिती : एक बिबट्या, दोन वाघांची कातडी आणि एक कार, एक दुचाकी केली जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : वन्यजीव गुन्हे नियंत्रण मुंबई यांचेकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वाघाची व बिबट्याची कातडी तस्करी करणाऱ्या टोळीस पुणे वनविभागाचे पथकाने जेरबंद करुन त्यांच्या ताब्यातून एका बिबट्याची व दोन वाघाची कातडी, दोन कार, एक दुचाकी जप्त केल्याची माहिती पुणे विनविभागाचे उपवनसरंक्षक राहूल पाटील यांनी दिली आहे.
शरद इंगोले (४७), बाळू बापू नामदास (६५), अकाश आणासाहेब रायते (२७), उदयसिंह शंकरराव सावंत (४७) व अमोत रमेश वेदपाठक (३४) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे.
दरम्यान, अनिकेत प्रमोद भोईटे (वय-२०), संदिप शंकर लकडे (३४), धनाजी नारायण काळे (३५) यांना वारजे परिसरात अटक करुन त्यांच्या ताब्यातून एक बिबटयाचे कातडे जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, सासवड बसस्थानक येथे वाघाची व बिबटयाची कातडी तस्करी करणाऱ्यास आलेल्या टोळीस, वन विभागाचे पथकाने बनावट गिऱ्हाईक बनवून माहितीची खातरजमा करत सापळा रचून दोन कार मधील पाचजणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून दाेन वाघाची व एक बिबटयाचे कातडे जप्त करण्यात आले आहे.
सहा.वनसंरक्षक मयुर बोठे, आशुतोष शेंडगे, भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, वनपाल, वैभव बाबर, वनरक्षक सुरेश बर्ले, रामेश्वर तेलंग्रे, महादेव चव्हाण, रईस मोमीन, परमेश्वर वाघमारे, योगेश तिकोळे, अमोल गुरव, अमोल साठे यांच्या पथकाने ही कारवाई केली.