स्वारगेट पोलीस स्टेशनची कामगिरी : तीन लाख ३५ हजारांचा ऐवज जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : स्वारगेट पोलीस स्टेशनमधील गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषण व सूत्रांच्या माहितीच्या आधारे दोन सराईत चोरट्यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून ११ मोटारसायकली सुमारे तीन लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.
दीपक परदेशी (वय २६, रा. रामटेकडी, हडपसर), विशाल ऊर्फ घाऱ्या सातपुते (वय २७, रा. गुढे, ता. पाटण, जि. सातारा) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, स्वारगेट पोलीस स्टेसनमधील गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार फिरोज शेख, संदीप साळवी, सोमनाथ कांबळे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि सूत्रांच्या माहितीनुसार चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तपास केले असता, त्यांनी पुणे शहर व जिल्ह्यात स्वारगेट, हडपसर, शिरवळ, खडकी या ठिकाणाहून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपनीच्या तीन लाख ३५ हजार रुपये किमतीच्या ११ मोटारसायकल हस्तगत केल्या.
पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक येवले, अमंलदार फिरोज शेख, संदीप साळवी, सोमनाथ कांबळे, खोमणे, शैलेश वाबळे, धावरे, गोडसे, बडे, भोकरे, दळवी, खेंदाड, तिटमे यांच्या पथकाने कामगीरी केली आहे.















