युनिट चारची कामगिरी : गंभीर स्वरूपाचे एकूण सात गुन्हे दाखल
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अतिक शेखला पिस्तुलासह अटक करण्यात युनिट चारला यश मिळाले असून, सदर आरोपीवर पुण्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, मारामारी, अग्निशस्त्र बाळगणे अशा प्रकारचे एकूण सात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
बुधवारी (२२ सप्टेंबर) गुन्हेगार अतिक शेख हा शिवाजीनगर एसटी स्टँड जवळ, वाकडेवाडी परिसरात आलेला आहे व त्याच्या कमरेला लोड पिस्टल आहे, अशी माहिती पोलीस हवालदार राजस शेख यांना मिळाल्यावरून सहायक पोलीस निरीक्षक शोभा क्षीरसागर, सहायक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पवार, पोलीस हवालदार दीपक भुजबळ, पोलीस नाईक संजय आढारी, प्रवीण भालचिम, पोलीस अंमलदार रमेश राठोड, सागर वाघमारे यांनी वाकडेवाडी परिसरात सापळा रचून अतिक शेख (रा. सय्यद नगर, हडपसर, पुणे) यास ताब्यात घेऊन त्याचे कब्जातील ३१,००० रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल व पाच जिवंत काडतुसे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आरोपी अतिक शेख हा पुणे शहर आयुक्तालयाचे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, मारामारी, अग्निशस्त्र बाळगणे अशा प्रकारचे एकूण सात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
आरोपीस न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड दिली असून आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने तो कोणत्या गंभीर स्वरूपाचा गुन्हा करणार होता, याबाबत त्याच्याकडे पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सदरची उल्लेखनिय कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर आयुक्त भाग्यश्री नवटक्के, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर, सहायक पोलीस निरीक्षक शोभा क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, पोलीस अंमलदार महेंद्र पवार, राजस शेख, दीपक भुजबळ, संजय आढारी, प्रवीण भालचिम, स्वप्निल कांबळे, रमेश राठोड, सागर वाघमारे यांनी केली आहे.















