मार्केट यार्ड पोलिसांची कारवाई : पिस्तुलासह एक जीवंत काडतूस केले जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : विना परवाना देशी बनावटीची पिस्टल बाळगणाऱ्या सराईताला मार्केट यार्ड पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून एक पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. सोमवारी (दि.4) आंबेडकरनगर वसाहत गल्ली नं.14 जवळील सार्वजनिक शौचालयाच्या मागे ही कारवाई करण्यात आली.
निलेशकुमार ओंकारनाथ मौर्या (वय-24 रा. आंबेडकर नगर, मार्केट यार्ड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, तपास पथकातील पोलीस कर्मचारी स्वप्नील कदम यांना मार्केट यार्ड येथील आंबेडकर नगर वसाहतीमधील
सार्वजनिक शौचालयाच्या मागे एका तरुणाकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून पंचासमक्ष अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्या कमरेला देशी बनावटीची पिस्टल आणि एक जीवंत काडतूस आढळून आले. आरोपी विरोधात मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक केली.
अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, परिमंडळ-५चे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली, मार्केट यार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए. व्ही. देशपांडे, पोलीस निरीक्षक गुन्हे सविता ढमढेरे यांच्या सूचनेनुसार, तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम, महिला पोलीस उपनिरीक्षका मनिषा गिरी, पोलीस हवालदार पवार, जाधव, स्वप्नील कदम, यादव, अनिश शेख, संदीप घुले, भिलारे, जाधव, चव्हाण, औंधकर, कुंभार, दिवटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
