समर्थ पोलिसांत गुन्हा : मंगळवार पेठेतील बारमध्ये घडला प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : बारमध्ये शिरुन वेटरशी वाद घालून हॉटेलच्या भागीदाराला मारहाण करुन काचा फोडून मोबाईल चोरुन नेण्याचा प्रकार समोर आला आहे. मालधक्का चौकातील रेड चिली रेस्टॉरंट अँड बार येथे सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.
प्रशांत लिंगप्पा तुंगे (वय २२, रा. मंगळवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी नितेशसिंह दिलीपसिंह हजारी (वय ३२, रा. वानवडी) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांच्या रेस्टॉरंटमध्ये मोटारसायकलवरुन आलेल्यांनी वेटरशी वाद घातला. हा वाद मिटविण्यासाठी फिर्यादीचे पार्टनर अभिजित गोरेकर (वय २९) हा गेला असताना आरोपींनी त्यांना व मॅनेजर सुविध पावले यांना धक्काबुक्की करुन कानाखाली मारली. अभिजित यांच्या डोक्यात दारुची मोकळी बाटली फोडून जखमी करण्याची भीती दाखवली. बारच्या काचा फोडून काऊंटरवर ठेवलेला मोबाईल घेवून गेले व आरोपींनी घाईमध्ये जाताना मोटारसायकल तेथेच ठेवून गेले. सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे तपास करीत आहेत.















