शिवाजीनगर पोलीस स्टेशन : दबाव टाकून 10 लाखाचा खंडणी प्रकरण
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : वेगवेगळ्या कार्यालयात, कोर्टात तक्रारी दाखल करुन ‘त्या’ मागे घेण्यासाठी १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी राजेश बजाज व बापू शिंदे यांच्यावर आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पाषाण येथील साईटवर १९ एप्रिल २०१७ पासून आतापर्यंत घडली आहे.
याप्रकरणी 55 वर्षीय व्यक्तीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राजेश खैरातीलाल बजाज (रा. प्रभात रोड) आणि बापू शिंदे (रा. नर्हेगाव) यांच्याविरुद्ध ३८४, ३८५, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादींना आरोपींनी प्रत्यक्ष भेटून त्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या कार्यालयात, चुकीच्या व खोट्या मजकुराच्या तक्रारी कोर्टात दाखल करुन फिर्यादीवर दबाव टाकून, धमकी देऊन तक्रारी मागे घेण्याकरीता १० लाख रुपयांची खंडणी
मागितली म्हणून गुन्हा दाखल केला आहे. बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध जनहित याचिका दाखल करुन ती मागे घेण्यासाठी १ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी खंडणीविरोधी पथकाने राजेश बजाज याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकास ५० लाखांची खंडणी मागून जबरदस्तीने फ्लॅट बळकाविल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात
राजेश बजाज व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राजेश बजाज याने अनेकांची यापूर्वी बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक केली आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांनी राजेश बजाज याच्याविरुद्ध १०० कोटी रुपयांचा बदनामीचा दावा दाखल केला आहे. याशिवाय दुसर्या एका बिल्डरची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने राजेश बजाज याला यापूर्वी अटक केली होती.















