अमिताभ गुप्ता : कोंढवा पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचे उद्घाटन
महाराष्ट्र ३६०न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील पोलीस स्टेशनच्या इमारतींमध्ये नागरिकांच्या दृष्टीने अधिक चांगल्या सोयी-सुविधा केल्या जातील. शहर पोलीस दलासाठी पुण्यातील सुजाण नागरिक वेळोवेळी मदतीचा हात पुढे करत आहेत, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले.
कोंढवा पोलीस स्टेशनच्या नव्या वास्तूचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, नगरसेवक गफूर पठाण, वीरसेन जगताप, रंजना टिळेकर, नंदा लोणकर, संजय घुले, साईनाथ बाबर, संगीता ठोसर, हसिना इनामदार, माजी नगरसेवक रईस सुंडके, हाजी फिरोज शेख आदी उपस्थित होते.
यावेळी जहांगीर दोराबजी, अमित गडोक, बिजेंद्र कुमार सिंह, परेश राघवानी, किरण देसाई, खुजेन नगरवाला, अबिद सय्यद, नानासाहेब मरळ, स्वप्नील मासाळ, समित शहा, भाऊसाहेब लोखंडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
पोलीस उपायुक्त नम्रता पाटील व विवेक देव यांनी प्रास्ताविक केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी आभार मानले.
















