समर्थ पोलिसांत गुन्हा : केईएम हॉस्पिटलशेजारील एस.व्ही. युनियन शाळेजवळील प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : अज्ञात चोरट्यांनी महिलेला बोलण्यात गुंतवून ३६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना के.ई.एम. हॉस्पिटलशेजारील एस. व्ही. युनियन शाळेजवळ घडली.
समर्थ पोलीस स्टेशनमध्ये ८४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून, त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी के.ई.एम. हॉस्पिटलशेजारून एस.व्ही. युनियन शाळेजवळून जात होत्या. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी बोलण्यात गुंतवून विश्वास संपादन केले. दरम्यान, त्या महिलेला सोन्याचे दागिने काढून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवण्यास सांगितले आणि हातचलाखीने ३६ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले.
पुढील तपास समर्थ पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षिका ज्योती कुटे करीत आहेत.














