पुणे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये कारवाई : ७७५ गुन्हेगार पकडून घातक ३० शस्त्रे जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : शहर पोलीस दलाच्या ‘ऑपरेशन ऑल आउट’ अंतर्गत शुक्रवारी रात्री १६२५ गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. त्यापैकी ७७५ गुन्हेगार मिळून आले. त्यातील दोघांकडे एक गावठी कट्टा आणि चार काडतुसे तसेच इतर गुन्हेगारांकडे कोयते, तलवार आणि चाकू अशी हत्यारे आढळून आली. ३० जणांविरोधात गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे, तसेच तपासणीदरम्यान विविध पोलीस ठाण्यांत दाखल गुन्ह्यांत फरार असलेल्या तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये गुन्हे शाखा व पोलीस ठाण्याकडील अधिकारी अंमलदार यांची पथके स्थापन करून शहरातील वेगवेगळ्या परिसरात ८ ते ९ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री ९ ते रात्री १ दरम्यान ऑल आउट ऑपरेशन करून कारवाई करण्यात आली.
आर्म ॲक्ट कलम ४(२५) प्रमाणे गुन्हे शाखेकडून ११, खडक-१, सहकारनगर-१, लष्कर-१, बंडगार्डन-१, दत्तवाडी-१, खडकी-१, येरवडा-३, विमानतळ-१, चंदननगर-१, लोणीकंद-१, हडपसर-२, मुंढवा-१, कोंढवा-१, लोणी काळभोर-३ अशा एकूण ३० केसेस करून त्यामध्ये ३० आरोपींना अटक करून त्यांच्याकडून २१ कोयते, ८ तलवारी, एक चाकू, असा सात हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आर्म ॲक्ट कलम ३(२५) प्रमाणे एक केस करून दोन आरोपी अटक केले, त्यांच्याकडून एक गावठी कट्टा आणि चार काडतुसे असा एकूण ५० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.
खंडणी विरोधी पथक-१ यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्यात पाहिजे आरोपी लक्ष्मण अण्णा धोत्रे यास अटक केले आहे.
अमली पदार्थविरोधी पथक-१ यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून आरोपी शुभम मिलिंद कुलकर्णी व अफाक अश्फाक शेख यांना अटक करून ४५२ ग्रॅम वजनाचा गांजा, एक मोबाईल, वजन काटा, एक मोटारसायकल, ६.२० ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) असा एक लाख ९० हजार ९५२ रुपयांचा माल हस्तगत केला आहे.
पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये अवैध धंद्यावर छापा कारवाई करून १७ आरोपी अटक करीत त्यांच्याकडून गावठी दारू १२३ लिटर सात हजार ३० रुपये, देशी दारूच्या बाटल्या एक हजार २९० रुपये, जुगाराचे साहित्य तीन हजार ८७० असा एकूण बारा हजार १०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील एकूण २३ हॉटेल्स, लॉजेसची तपासणी करण्यात आली.
वाहतूक शाखा यांनी पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील ६४४ वाहनांची तपासणी करून १८१ वाहनांवर दंडात्मक कारवाई करून ४५ हजार ५०० रुपये दंडाची रक्कम जमा केली.
युनिट-१ गुन्हे शाखा यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमधील अभिलेखावरील पाहिजे आरोपी राहुल संजय क्षीरसागर यास अटक केले.
युनिट-६ गुन्हे शाखा यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनमधील अभिलेखावरील पाहिजे आरोपी अमोल रमेश गालफाडे (वय २५) याला अटक केले.
खंडणीविरोधी पथक-१ यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनमधील अभिलेखावरील पाहिजे आरोपी लक्ष्मण अण्णा धोत्रे यास अटक केले.
अमली पदार्थविरोधी पथक-१ यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून आरोपी शुभम मिलिंद कुलकर्णी व अफाक अश्फाक शेख यांना अटक करून त्यांच्याकडून ४५२ ग्रॅम वजनाचा गांजा, एक मोबाईल, वजनकाटा, एक मोटारसायकल, ६.२० ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) असा एकूण एक लाख ९० हजार ९५२ रुपयांचा माल हस्तगत केला आहे.
पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील २३ लॉजेस-हॉटेल्स तपासण्यात आली. वाहतूक शाखा यांनी पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील ६४४ वाहने तपासून १८१ वाहनांवर दंडात्मक कारवाई करून ४५ हजार ५०० रुपये दंड जमा केला. पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये अवैध धंद्यावर छापा टाकून १७ आरोपी अटक करीत त्यांच्याकडून गावठी दारू १२३ लिटर सात हजार ३० रुपये, देशी दारूच्या बाटल्या एक हजार २९० रुपये, जुगाराचे साहित्य तीन हजार ७८० रुपये असा एकूण बारा हजार १०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशान्वये पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त (गुन्हे) भाग्यश्री नवटके, पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, सागर पाटील, पौर्णिमा गायकवाड, पंकज देशमुख, नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, तसेच पोलीस स्टेशनमधील अधिकारी-अंमलदार यांच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. यापुढेही ऑल आउट ऑपरेशन राबवून गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
