सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : पिस्टल व जिवंत काडतूस जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : सोबत घातक शस्त्रास्त्र बाळगणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात सिंहगड रोड पोलिसांना यश मिळाले असून, त्यांच्याकडून एक पिस्टल व जिवंत काडतूस असा ३०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नवरात्रीच्या उत्सवाच्या अनुषंगाने सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार सचिन माळवे यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, फनटाईमच्या पाठीमागे कॅनोल रोडला वडगाव बुद्रुक पुणे येथे दोन इसम गावठी पिस्टल घेऊन थांबलेले आहेत. सदरची बातमी वरिष्ठांना कळवून वरिष्ठांनी योग्यती कारवाई करण्याचे आदेशित केल्याने सदर ठिकाणी जाऊन फनटाईम थिएटरच्या पाठीमागील कॅनोड रोडला आडबाजूस थांबून मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री करता बातमीतील वरील वर्णनाचा इसम व त्या बरोबर अजून एक जण सदर ठिकाणी उभे असल्याचे दिसले. त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
अनिकेत दादासो पवार (वय २१, रा. नऱ्हे, पुणे) आणि अनुराग बाळकृष्ण मोरे (वय २०, रा. चरवडवस्ती, वडगाव, पुणे) अशी त्यांची नावे आहेत. त्याची अंगझडती घेता अनिकेतजवळ ३०,००० रुपये किमतीची एक पिस्टल व अनुराग यांच्याकडे एक जिवंत राऊंड जप्त करण्यात आला. तसेच सदर इसमांनी ४ ऑक्टोबर रोजी रात्रौ दहाच्या सुमारास रेणुकानगरी येथील वैभव मेडिकलच्या काचा कोयत्याने फोडून नुकसान केल्याचे कबूल केल्याने त्यांना दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस उप-आयुक्त पोर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक, चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक, कुलदीप संकपाळ, पोलीस अंमलदार, उज्ज्वल मोकाशी, सचिन माळवे, शंकर कुंभार, किशोर शिंदे, सागर भोसले, इंद्रजित जगताप, सुहास मोरे, अमोल पाटील, विकास पांडोळे, विकास बादल, अविनाश कोंडे यांचे पथकाने केली.
