पुणे सायबर पोलिसांची कामगिरी : २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि. या कंपनीचे इंशुरन्स रिनिव्हलकरिता पैसे घेऊन बनावट इंशुरन्स सर्टिफिकेट देऊन लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील आरोपीतास अटक करण्यात पुणे सायबर पोलिसांना यश मिळाले असून, आरोपीतास २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे,तसेच बहुसंख्य लोकांच्या संभाव्य होणाऱ्या फसवणुकीस आळा घातला आहे.
सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहरकडील वर नमुद गुन्ह्यातील फिर्यादी विशाल काटकर (आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि कंपनीचे तपासी अधिकारी) यांना १५ जुलै २०२१ ते १८ ऑगस्ट २०२१ दरम्यान आरोपीतांनी स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता फिर्यादी हे नोकरी करीत असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि या कंपनीच्या नावाचा वापर करून सहा प्रकारच्या विविध मोबाईल क्रमांकाचा वापर करून नागरिकांना बनावट विमा पॉलिसी विकत देऊन आयसीआयसीआय बँक अकाउंट व एचडीएफसी बँक अकाउंट खात्यांमध्ये पैसे भरावयास लावून त्यांची आर्थिक फसवणूक केली म्हणून दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तांत्रिक तपास करता, आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि या कंपनीत सन २०१४ ते २०२० या कालावधीत युनिट सेल्स मॅनेजर म्हणून नोकरीस असलेला इसम सौरभ राजेशसिंग भदोरीया याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर येथील एक पोलीस पथक १२ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे रवाना केले.
नमुद आरोपी एमआयडीसी पोलीस ठाणे, नागपूर शहर यांचे हद्दीत मिळून आला. त्याचे नांव सौरभ राजेशसिंग भदोरीया (वय ३०, रा. वानडोंगरी, हिंगणा रोड, नागपूर) असे आहे. नमुद आरोपीताने कंपनीत नोकरीस असताना सदर कंपनीतील लोनधारक व इन्शोरन्स काढलेल्या इसमांची माहिती घेऊन त्यांचा अन्य साथीदार व इतर यांचे मदतीने, कस्टमर लोकांचे इन्शोरन्सची तारीख संपण्यास आली असताना त्यास फोन करून इन्शुरन्स रिनिव्हल करण्याचे सांगून त्यांना संबंधित खात्यांमध्ये पैसे ट्रान्स्फर करावयास लावून तसेच लोकांना बनावट इन्शोरन्स सर्टिफिकेट देऊन त्यांची फसवणूक करत असल्याची माहिती मिळाली आहे. सदर आरोपीताकडे तपास करून पाहिजे आरोपीताचा शोध सुरू आहे. अटक आरोपीतास २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आला आहे.
या कारवाईद्वारे सायबर पोलसांनी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि या कंपनीचे नाव व लोगोचा वापर करून लोकांना बनावट इन्शोरन्स सर्टिफिकेट देऊन त्यांची फसवणूक करणारे टोळीतील आरोपीतास अटक करून अशा प्रकारे बहुसंख्य लोकांची संभाव्य होणारी फसवणुकीस आळा घातला आहे.
सदरची कारवाई ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, पोलीस निरीक्षक चिंतामण, सहपोलीस निरीक्षक भालेराव, पोलीस हवालदार संदेश कर्णे, अंमलदार नवनाथ जाधव, नितीन चांदणे, प्रसाद पोतदार या पोलीस पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे.
