शिवाजीनगर पोलीस स्टेशनची कामगिरी : उच्च शिक्षित तरुणीने पोलिसांकडे तक्रार करताच केली कारवाई
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : उच्चशिक्षणघेत असलेल्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचा व्हीडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
विकी ऊर्फ विकास विनायक राठोड (वय २१, रा. शिवांश हाईट्स, शिंदेनगर, मारुंजी, पुणे, मूळ गाव- ता. पैठण, जि. औरंगाबाद ) , निखील प्रताप पाटील (वय ३१, रा. मातोश्री बिल्डिंग, शिंदेनगर, मारुंजी गाव, पुणे, रा. खरोसा, ता. औसा, जि. लातूर), अमर गोरखनाथ राठोड (वय २३, रा. थापटी, तांडा, ता. पैठण, जि. औरंगाबाद) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पीडितेने शिवाजीनगर पोलीस स्टेशनमधील महिला अंमलदार यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करून तपास सुरू केला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीला ताब्यात घेऊन तपास केला असता त्याने गुन्हा कबुल केला. विकी राठोडने व्हीडिओ बनवून अमर गोरखनाथ राठोड याच्याकडे पाठवून त्याद्वारे सोशल मीडियावर धमकावल्याचे तपासत निष्पन्न झाले.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षिका अनिता मोरे करीत आहेत. अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे, पोलीस निरीक्षक विक्रम गौड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उत्तम माने, पोलीस उपनिरीक्षक अरविंद म्हस्के, पोलीस अंमलदार अनिकेत भिंगारे, राहुल होळकर, तुकाराम म्हस्के, शरद राऊत, महिला पोलीस अंमलदार मंगल काटे, तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर, सहायक पोलीस फौजदार एकनाथ कंधारे, पोलीस हवालदार रणजित फडतरे, पोलीस हवालदार रुपेश वाघमारे, अविनाश भिवरे, कांतिलाल गुंड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.















