कोथरूड पोलिसांत गुन्हा : ओरिएंट शिवम डेव्हलपर्ससह 5 जणांवर गुन्हा
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : फ्लॅटचा व्यवहार करुन एका महिलेकडून 18 लाख रुपये घेऊन तो फ्लॅट दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पुण्यातील ओरिएंट शिवम डेव्हलपर्ससह ५ जणांवर कोथरुड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 6 मार्च 2018 ते 13 ऑक्टोबर 2021 या कालावधीत कोथरुड येथील ओरिएंट अँड प्रमोटर्सच्या कार्यालयात घडला.
याप्रकरणी 50 वर्षीय महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ओरिएंट शिवम डेव्हलपर्स, पार्टनर दिबेन्दु मोईत्रा (रा. गोखलेनगर, पुणे), महेंद्र येवले (वय-53 रा. घोलेरोड, पुणे), शिवम प्रमोटर्स, रमेश जैन (रा. अहमदनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने ओरिएंट अँड प्रमोटर्स यांच्या कोंढवा बु. येवलेवाडी येथील लोटस बिल्डीग मध्ये फ्लॅट खरेदी केला आहे. फ्लॅटच्या खरेदी व्यवहारापोटी फिर्यादी यांनी आरोपींना 18 लाख रुपये दिले. फिर्यादी यांच्याकडून पैसे घेऊनही आरोपींनी फसवणूक करण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांना खरेदी खत करुन दिले नाही. तसेच फिर्यादी यांनी घेतलेला फ्लॅट त्यांच्या परस्पर सुनिल महाडिक या व्यक्तील विकून आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास कोथरुड पोलीस करीत आहेत.















