येरवडा पोलिसांची कामगिरी : संगमवाडी येथे सापळा रचून घेतले ताब्यात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : तू आमच्या गाडीला धडक देऊन नुकसान केले, भरपाई दे असे म्हणून जबरदस्तीने बुलेट घेऊन जाणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
जैदजमीर दलाल (वय २०), कासिम आसिफ अन्सारी (वय १९), यश कुंदन वारे (वय १९, रा. तिघेही गंजपेठ, पुणे) असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी येरवडा येथून बुलेटवरून जात असताना ॲक्टिवावरून तिघेजण आले आणि तु आमच्या गाडीचे नुकसान केले आहे, भरपाई दे असे म्हणत जबरदस्तीने बुलेट घेऊन गेले होते.
या गुन्ह्यातील आरोपी संगमवाडी येथे आल्याची माहिती सूत्रांकडून पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एक लाख रुपये किमतीची बुलेट जप्त केली आहे.
पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख, पोलीस निरीक्षक विजयसिंग चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर, सहायक पोलीस फौजदार प्रदीप सुर्वे, दत्ता शिंदे, पोलीस अंमलदार कैलास डुकरे, अमजद शेख, गणेश वाघ, किरण घुटे, गणेश शिंदे, अनिल शिंदे, राहुल परदेशी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
















