बार्शी पोलिसांची कारवाई : ९५ हजार ४०० रुपयांचा गांजा केला जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
बार्शी : गांजा विक्रीसाठी नेणाऱ्या दोघांना जेरबंद करून त्यांच्याकडून २१ किलो २०० ग्रॅम वजनाचा सुमारे ९५ हजार ४०० रुपयांचा गांजा जप्त केला. ही कारवाई ताडसौंदने रोड, बी.आय.टी. कॉलेजजवळ बार्शी शहर पोलिसांनी केली.
तानाजी दिलीप माने (वय ३२, रा. तुळजा भवानी कारखाना, नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) आणि दुर्गा दीपक हाजगुडे (वय ३०, रा. नाले प्लॉट, बार्शी, ता. बार्शी, जि. सोलापूर ) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, एक महिला व पुरुष दोघेजण अक्टिवावरून गांजा विक्री करण्यासाठी बी.आय.टी. कॉलेज, कालव्याजवळ येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता २१ किलो ४०० ग्रॅम वजनाचा सुमारे ९५ हजार ४०० रुपयांचा गांजा मिळून आला, पंचासमक्ष पंचनामा केला.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आर. आर. शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. डी. उदार, सहायक पोलीस फौजदार वरपे, पोलीस हेडकॉन्स्टेबल माळी, भोंग, वाघमोडे, पोलीस नाईक पवार, ठेंगल, पोलीस कॉन्स्टेबल घोंगडे, बारगिर, लगदिवे, गोसावी, खाडे, महिला पोलीस अंमलदार देशमुख, कोतवाल, पारधी, साबळे, शबीर मुलानी, घुले यांच्या पथकाने ही कामगिरी केली.